लग्नाच्या मांडवाने अडविली महामंडळाची बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:22 PM2018-06-03T23:22:38+5:302018-06-03T23:24:40+5:30

महामंडळाची महाकाय बस जेव्हा खेड्यातल्या निमूळत्या रस्त्यावरून जाते, तेव्हा अख्खा रस्ता बंद होतो. पण गावकरी कधी ओरडत नाही. मात्र, अशाच एका रस्त्यावर गावकऱ्यांनी लग्नाचा मांडव घातला, म्हणून चक्क महामंडळाच्या बसला परत फिरावे लागले.

The corporation bus which was blocked by the marriage arrangement | लग्नाच्या मांडवाने अडविली महामंडळाची बस

लग्नाच्या मांडवाने अडविली महामंडळाची बस

Next
ठळक मुद्देचिचघाटमधील प्रकार : पर्यायी रस्ता असतानाही चालकाचा हेकेखोरपणा, बस आणली आगारात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महामंडळाची महाकाय बस जेव्हा खेड्यातल्या निमूळत्या रस्त्यावरून जाते, तेव्हा अख्खा रस्ता बंद होतो. पण गावकरी कधी ओरडत नाही. मात्र, अशाच एका रस्त्यावर गावकऱ्यांनी लग्नाचा मांडव घातला, म्हणून चक्क महामंडळाच्या बसला परत फिरावे लागले. विशेष म्हणजे पर्यायी रस्ता असतानाही चालकाने हेकेखोरपणे बस आगारात परत आणली. हा प्रकार रविवारी चिचघाट गावात घडला.
चिचघाट गावातून वर्षानुवर्षापासून गावातल्या छोट्या रस्त्यातून परिवहन महामंडळाची बस जाते. इतर वेळी गावात येणारी ही बस लोकांच्या आकर्षणाचा विषय असते. मात्र, रविवारी तीच बस अडचण ठरली. झाले असे की, चिचघाटमध्ये रविवारी लग्न सोहळा होता. ज्या रस्त्यावरून बस जाते, त्याच रस्त्यावर मांडव टाकण्यात आला होता.
लग्नाचा मांडव पडलेला असतानाच रविवारी सकाळी ७ वाजता यवतमाळ आगाराची यवतमाळ-घाटंजी ही बस (एमएच ४० एन ९५१७) गावात पोहोचली. यवतमाळवरून आलेल्या या बसला शिवणीमार्गे घाटंजीकडे जायचे होते. मात्र चिचघाटमधील मांडवामुळे तिचा रस्ता अडला. त्यावेळी गावकºयांनी बसला पुढे जाण्यास मज्जाव केला. तर बस चालक आणि गावकºयांनी आपलीच बाजू कशी बरोबर हे सांगण्याचा अट्टहास केला. गावातले लग्न असल्यामुळे रस्त्यावर मांडव टाकण्यात येणार आहे, याची माहिती गावकºयांनी आधीच यवतमाळ आगाराला कळविली होती. रविवारी या मार्गाने बस पाठवू नका, असा अर्ज केला होता. तरीही बस आल्याने गावकरी चिडले. त्यांनी मांडव काढण्यास नकार दिला आणि चिडलेल्या चालकाने प्रवाशांनी भरलेली बस थेट माघारी वळवून यवतमाळ बसस्थानकात परत आणली.
या बसमध्ये दिलीप पोयाम, बिपीन जयस्वाल, जीवन देवकते, नायरू शेख सलीम, आनंद कट्यारमल हे प्रवास करीत होते. वैभव भूषण किनकर हा विद्यार्थीही त्यात बसला होता. त्याचा बीएससीचा पेपर होता. यावेळी प्रवाशांनी सजगता दाखवित या विद्यार्थ्याला घाटंजीत जाण्याची व्यवस्था करून दिली. गावकºयांच्या या प्रकाराने प्रवासी आणि एसटी महामंडळाचे कर्मचारी अवाक् झाले.

Web Title: The corporation bus which was blocked by the marriage arrangement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.