नगरसेविकेनेच लावली मृत वराहाची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:00 AM2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:13+5:30
जवळपास १५ दिवसपर्यंत नगरपालिकेचे कर्मचारी ट्रॅक्टर आले नाही. अधिकारी एवढेच नव्हे तर मुख्याधिकाऱ्यांनीही ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. अखेर या वॉर्डाशी संबंधित नगरसेविका सुषमा राऊत याच पुढे आल्या. नाकाला रुमाल बांधून मृत वराह प्लास्टिकच्या थैलीत भरला. दुचाकीवर घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मृत वराहाच्या दुर्गंधीने परिसरातील लोकांचा जीव कासावीस होत होता. नगरपरिषदेच्या लोकांशी परिसरातील नागरिकांनी संपर्क केला. कुणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. वॉर्डाशी संबंधित नगरसेविकेनेही यासाठी फोनाफानी केली. मात्र कुणीही आले नाही. अखेर या नगरसेविकेनेच मृत वराहाची थैलीत भरून विल्हेवाट लावली. सुषमा राऊत असे या नगरसेविकेचे नाव आहे.
पिंपळगाव परिसरातील दोनाडकर ले-आऊट परिसरात वराह मृत पावला. याची लवकर विल्हेवाट लावली गेली नाही. त्यामुळे नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले. जवळपास १५ दिवसपर्यंत नगरपालिकेचे कर्मचारी ट्रॅक्टर आले नाही. अधिकारी एवढेच नव्हे तर मुख्याधिकाऱ्यांनीही ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. अखेर या वॉर्डाशी संबंधित नगरसेविका सुषमा राऊत याच पुढे आल्या. नाकाला रुमाल बांधून मृत वराह प्लास्टिकच्या थैलीत भरला. दुचाकीवर घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावली. याठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने सामाजिकतेचा परिचय दिला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.