पालिका प्रशासनाविरोधात नगरसेवकांचा एल्गार

By admin | Published: November 3, 2014 11:33 PM2014-11-03T23:33:25+5:302014-11-03T23:33:25+5:30

उमरखेड नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरूद्ध माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल यांच्या नेतृत्वात विरोधी गटातील नगरसेवकांनी नगर पालिकेला कुलूप ठोकून कामकाज बंद पाडले.

Corporator's Elgar against municipal administration | पालिका प्रशासनाविरोधात नगरसेवकांचा एल्गार

पालिका प्रशासनाविरोधात नगरसेवकांचा एल्गार

Next

उमरखेड (कुपटी) : उमरखेड नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरूद्ध माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल यांच्या नेतृत्वात विरोधी गटातील नगरसेवकांनी नगर पालिकेला कुलूप ठोकून कामकाज बंद पाडले. या आंदोलनात नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी १.३० वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
उमरखेड नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांच्या कोणत्याही तक्रारीची दखलच घेतल्या जात नाही. त्याचप्रमाणे शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घंटागाड्या नियमित कचरा गोळा करीत नाही, रस्त्याच्या कडेला खताचे उकिरडे दिसून येतात. शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद आहेत. डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित फवारणीसुद्धा होत नाही. यासोबतच सामान्य प्रशासन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, कर विभाग, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, आरोग्य व विद्युत विभागासंदर्भात नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. या तक्रारींची पालिका प्रशासनाकडून दखलच घेतल्या जात नाही. त्यामुळे माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष नेते अ‍ॅड. संतोष जैन, इनायतउल्ला, साजिद जागिरदार, रामराव भुरके, गजेंद्र ठाकरे, सागीरभाई आदींनी नागरिकांच्या मागण्यांसह नगर परिषदेवर धडक दिली. व सकाळी ९ वाजता पालिकेच्या मुख्य प्रवेश व्दाराला कुलूप ठोकले. व तेथेच धरणे आंदोलन सुरू केले. सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याने भाजपाचे शहराध्यक्ष नितीन भुतडा, शिवसेना शहर प्रमुख डॉ. अजय नरवाडे, डॉ. संजय तेला, प्रमोद रुडे, एजाज खान, दिनेश तेला, राजेश कवाने यांच्यासह शहरातील विविध भागातील शेकडो नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले.
हे आंदोलन जवळपास सहा तास चालले. आंदोलकांची समजूत काढण्यासाठी मुख्याधिकारी प्रवीण मानकर, शिक्षण सभापती नंदकिशोर अग्रवाल, सुरेश माहेश्वरी यांनी तिथे येऊन आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. तसेच एक महिन्याच्या आत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Corporator's Elgar against municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.