आर्णी येथे नगरसेवकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:10 PM2019-07-12T22:10:36+5:302019-07-12T22:11:47+5:30

येथील नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी पालिकेसमोर एक दिवसीय उपोषण केले. यावेळी उपोषणकर्त्यांनी पालिका पदाधिकारी व प्रशासनाला आपल्या कर्तृत्वाचा विसर पडल्याचा आरोप केला.

Corporators' fasting at Arni | आर्णी येथे नगरसेवकांचे उपोषण

आर्णी येथे नगरसेवकांचे उपोषण

Next
ठळक मुद्देनियोजनशून्य कारभार : पालिका पदाधिकाऱ्यांना पडला कर्तृत्वाचा विसर

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : येथील नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी पालिकेसमोर एक दिवसीय उपोषण केले. यावेळी उपोषणकर्त्यांनी पालिका पदाधिकारी व प्रशासनाला आपल्या कर्तृत्वाचा विसर पडल्याचा आरोप केला.
शहरात विकास कामे खोळंबली आहे. त्याला नगराध्यक्ष व प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे. विकास कामांचा खोळंबा, अनधिकृत आर्थिक व्यवहार, निकृष्ट दर्जाची कामे, कचऱ्याची समस्या आदी प्रश्नांवर काँग्रेस व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी लाक्षणिक उपोषण केले. विरोधी नगरसेवकांचे प्रशासनात कुणीही ऐकून घेत नाही. त्यामुळे जनतेला काय उत्तर देणार, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.
नगरपरिषदेकडे उपलब्ध नऊ कोटींच्या निधीतून रस्ते, नाल्या, वास्तू व इतर विकास कामांच्या निविदा काढाव्या, घनकचरा, घंटागाड्या सुरू करून स्वच्छतेचे काम सुरू करावे, विद्युत साहित्य, स्टेशनरी, सिमेंट पाईप, मुरूम आदींच्या निविदा काढाव्या, आमणी विहिरीवरून पाण्याच्या टाकीपर्यंत झालेल्या दीड कोटीच्या कामाची गुणवत्ता तपासावी, प्रभाग क्र.१, ६, ७ मध्ये वाढीव पाणीपुरवठा सुरू करावा, करमूल्य निर्धारणाचे २५ लाख रुपये बेकायदेशीरपणे दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या. मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले.
उपोषणात माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस गटनेते आरिज बेग, राष्ट्रवादीचे गटनेते चिराग शहा, नगरसेवक अन्वर पठाण, कादर इसाणी, निलंकुश चव्हाण, शंकर वाघमारे, यासिन नागाणी, अनिता भोयर, सुषमा सुरटकर, सुरेखा मेंडके, अंजली खंदार, उमा शिवरामवार, ज्योत्स्रा ठाकरे, स्वाती व्यवहारे, सुनीता पिल्लेवार सहभागी झाल्या होत्या. समस्या न सुटल्यास यापुढेही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला.

Web Title: Corporators' fasting at Arni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप