कॉटन जिनिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:16 PM2018-01-31T22:16:09+5:302018-01-31T22:16:31+5:30

शहरालगतच्या निळापूर-ब्राम्हणी मार्गावरील अहेफाज कॉटन जिनिंगला अचानक आग लागल्याने आठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

Cotton jining fire | कॉटन जिनिंगला आग

कॉटन जिनिंगला आग

Next
ठळक मुद्देनिळापूर-ब्राम्हणी मार्गावरील अहेफाज कॉटन जिनिंगला अचानक आग



लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहरालगतच्या निळापूर-ब्राम्हणी मार्गावरील अहेफाज कॉटन जिनिंगला अचानक आग लागल्याने आठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
बुधवारी दुपारी अचानक या जिनिंगल आग लागली. पाहता पाहता सरकीने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण परिसर या आगीने आपल्या विळख्यात घेतला. तसेच या आगीने मशिनलाही आपल्या कवेत घेतले. या आगीत लाखो रूपयांची सरकी व लाखो क्विंटल कापूस जळून खाक झाला. या घटनेची महिती मिळताच, जिनिंगमधील दोन टँकरद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने याबाबत पोलीस व अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. यासंदर्भात जिनिंगचे मालक आरिफ भाई यांना विचारणा केली असता, आपण बाहेर असल्यामुळे नुकसानीचे अवलोकन केले नाही, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Cotton jining fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग