कापसाच्या उत्पादनात घट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:01 AM2018-10-10T00:01:52+5:302018-10-10T00:02:56+5:30

यावर्षी कापूस शेतकऱ्यांना दगा देण्याची चिन्हे आहेत. सलग दुसºया वर्षीही निसर्गाची अवकृपा झाल्याने कापसाचे उत्पादन यावर्षीही घटणार, अशी भीती शेतकºयांमध्ये आहे. झाडांची वाढ खुंटल्याने फळांची संख्या घटणार, यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.

Cotton production will fall | कापसाच्या उत्पादनात घट होणार

कापसाच्या उत्पादनात घट होणार

Next
ठळक मुद्देझाडांची वाढ खुंटली : कापूस उत्पादकांवर निसर्गाची अवकृपा

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : यावर्षी कापूस शेतकऱ्यांना दगा देण्याची चिन्हे आहेत. सलग दुसºया वर्षीही निसर्गाची अवकृपा झाल्याने कापसाचे उत्पादन यावर्षीही घटणार, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. झाडांची वाढ खुंटल्याने फळांची संख्या घटणार, यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.
मागील वर्षी बोंडअळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रडवून सोडले. शासनाने भरपाईची तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. शासकीय मदतीतून बि-बियाणांचा खर्च तरी भागला. मात्र शेती फायद्याची न ठरल्याने शेतकऱ्यांना कुटुंबाचा गाडा हाकताना प्रचंड कसरत करावी लागली. वणी विभागात कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. आता कापूस, सोयाबीन व तूर ही तीनच मुख्य पिके शेतकऱ्यांचा आधार ठरताहेत. या भागात सिंचनाच्या सुविधा नाही. केवळ आठ टक्के शेती सिंचनाखाली आहे. त्यामुळे इतर जोडपिके व रबी हंगाम हा शेतकऱ्यांच्या उपयोगाचा ठरत नाही. म्हणूनच वारंवार दगा देत असतानाही शेतकऱ्यांना कापूस या कोरडवाहू पिकाचीच पेरणी करावी लागते. यावर्षी कापूस पेरणी झाल्यानंतर पाऊस अधिक प्रमाणात आला. त्यामुळे कापसाच्या झाडांना वाढण्यास वाव मिळाला नाही. त्यानंतर यावर्षीसुद्धा बोंडअळीचा प्रादूर्भाव लवकर व मोठ्या प्रमाणात होईल, अशा बातम्या कानावर पडत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस झाडावर सुरूवातीपासून किटकनाशकांचा फवारा सपाट्याने सुरू केला. परिणामी किटकनाशकांच्या मात्रा अधिक झाल्याने झाडांची वाढ पुन्हा खुंटली. झाडांना फांद्या फुटून त्याचा विस्तार झालाच नाही. अजुनही शेतात कापसाची झाडे उभाट स्वरूपातच दिसून येते. झाडांचा पसारा न वाढल्याने बोंडाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी बोंडअळीचा प्रकोप नसूनही कापसाचे उत्पादन घटणार आहे. यंदा शेतकऱ्यांचा खते व किटकनाशके यावरील खर्च वाढल्याने मशागत खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी कापसाला किमान आठ हजार रूपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. कापसाचे भाव पाडल्यास शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरणे कठीण होणार आहे.
कापसाला हवा आठ हजार रूपये भाव
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे नफा पाडायचा असेल तर शासनाने कापसाला प्रति क्विंटल आठ हजार रूपये भाव देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कृषी विद्यापीठांच्या तज्ज्ञ समितीने कापसाचा उत्पादन खर्च सात हजार २७२ रूपये काढला आहे. मात्र शासनाचा हमी भाव पाच हजार ४५० रूपये आहे. शेतकऱ्यांना एक हजार ८५२ रूपयांचा तोटा सहन करूनच कापूस विकावा लागतो, हे कापसाचे अर्थशास्त्र आहे. तर मग कापूस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होणार नाही काय, ‘शिमग्याला पीक अन् दिवाळीला भिक’ अशी शेतकऱ्यांची सदैव स्थिती असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत वाढत आहे. शासन मात्र ‘जखम शेंडीला अन् पट्टी मांडीला’ धोरण राबवित असल्याने शेतकरी देशोधडीला लागत आहे.

Web Title: Cotton production will fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.