आरंभी येथे बनावट नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 09:11 PM2019-09-02T21:11:01+5:302019-09-02T21:13:46+5:30

आरंभी येथील शंकर साधू पवार (४९) याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून शंकर पवार याला ताब्यात घेतले. शंकरच्या घराची झडती घेतली असता शंभर रुपयांच्या २५३ बनावट नोटा आढळल्या. सदर चलनी नोटा कुठून आणल्या, अशी विचारणा केली असता त्याने नीतेश राठोड (२४) रा.धुंदी, ता.पुसद याच्याकडून नोटा मिळाल्याचे सांगितले.

counterfeit notes were seized here in Aarambhi | आरंभी येथे बनावट नोटा जप्त

आरंभी येथे बनावट नोटा जप्त

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : १०० रुपयांचा २५३ नोटा घेतल्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील आरंभी येथील एका युवकाकडे शंभर रुपयांच्या २५३ बनावटी नोटा आढळल्या. पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंदविला.
आरंभी येथील शंकर साधू पवार (४९) याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून शंकर पवार याला ताब्यात घेतले. शंकरच्या घराची झडती घेतली असता शंभर रुपयांच्या २५३ बनावट नोटा आढळल्या. सदर चलनी नोटा कुठून आणल्या, अशी विचारणा केली असता त्याने नीतेश राठोड (२४) रा.धुंदी, ता.पुसद याच्याकडून नोटा मिळाल्याचे सांगितले.
पोलिसांनी नीतेशची चौकशी केली असता त्याने सदर नोटा धीरजसिंग बंडूसिंग गौतम (ठाकूर) (४८) रा.धुंदी, ता.पुसद याच्याकडून त्या मिळाल्याचे सांगितले. पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी शंकर पवार आणि नीतेश राठोड या दोघांना अटक करण्यात आली. धीरजसिंग गौतम फरार आहे. दिगसचे पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, सहाय्यक निरीक्षक विनायक जाधव आणि डीबी पथकाचे नितीन वास्टर, अरविंद कोकाटे, धम्मानंद केवटे, मनोज चव्हाण, दीपक ढगे, सरस्वती मुळे यांनी आरंभी गाठून ही कारवाई केली. सदर नोटा शंकर पवार याच्या घरातील एका पांढऱ्या रंगाच्या डब्ब्यात होत्या. पोलिसांनी एकूण २५ हजार ३०० रुपये जप्त केले. या बनावट नोटा चलण्यात आणल्या जाणार होत्या. तत्पूर्वीच पोलिसांनी रविवारी रात्री घाड मारून त्या जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

Web Title: counterfeit notes were seized here in Aarambhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.