योगा आणि होलिस्टिक हेल्थ विषयावर अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:50 AM2021-09-10T04:50:49+5:302021-09-10T04:50:49+5:30
उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास राऊत होते. अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. ...
उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास राऊत होते. अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. प्रदीप खेडकर, संस्थेच्या सचिव डॉ. संगीता घुईखेडकर, उपप्राचार्य डॉ. सुनील चकवे, डॉ. प्रशांत बागेश्वर प्रामुख्याने उपस्थित होते. या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षक विक्रम कुमार, भावेश नेरकर, अपर्णा पाठक व गोपाल सिंग होते.
यावेळी संपूर्ण आरोग्यासाठी कोणते आसन केले पाहिजे, श्वासाला असणारे महत्त्व, कशाप्रकारे श्वास घेऊन आपण श्वसन क्रियेवर नियंत्रण प्राप्त करून विविध आजारावर मात करू शकतो, याचे प्रशिक्षण देण्यात आले. खेळाबाबत डॉ. प्रकाश चोपडे, डॉ. शिरीष टोपरे, प्रा. सुनील डंभारे, डॉ. अतुल पाटील, प्रा. संजय हिरोडे, डॉ. रविजीत गावंडे, डॉ. राजेश चंद्रवंशी, डॉ. अजय बोंडे, डॉ. सीमा देशमुख, डॉ. सागर नारखडे, डॉ. रविभूषण कदम आदींनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास राऊत होते. डॉ. संगीता घुईखेडकर, डॉ सुनील चकवे, डॉ. प्रशांत बागेश्वर प्रामुख्याने उपस्थित होते.
बॉक्स
विविध राज्यातील विद्यार्थी सहभागी
काश्मीर येथील शाईस्ताबानो यांनी मनोगत व्यक्त केले. या अभ्यासक्रमात महाराष्ट्र, बिहार, उत्तराखंड, ओरिसा, कर्नाटक व जम्मू काश्मीर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अभ्यासक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. सुनील डंभारे, प्रा. धनश्री कोठेकर, डॉ.पी एच. भागवत, प्रा. स्नेहा माहूरकर यांनी परिश्रम घेतले.