कोरोनाचं वाढतं संकट! यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह १४५ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 06:02 PM2021-02-20T18:02:29+5:302021-02-20T18:02:46+5:30
Covid Cases In Yavatmal: गेल्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह १४५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
गेल्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह १४५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ८१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. (Covid Cases In Yavatmal)
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ तालुक्यातील ५० वर्षीय आणि नेर तालुक्यातील ४१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या १४५ जणांमध्ये ८४ पुरुष आणि ६१ महिला आहेत. यात यवतमाळातील ६३ रुग्ण, पुसद येथील २५, दिग्रस १७, कळंब १६, दारव्हा १५, महागाव ४, घाटंजी २, झरीजामणी २ आणि नेर येथील १ रुग्ण आहे.
शनिवारी एकूण १३८० रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १४५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर १२३५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९२९ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १५,९७० झाली आहे. २४ तासात ८१ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १४,५९५ आहे. तर जिल्ह्यात एकूण ४४६ मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 151742 नमुने पाठविले असून यापैकी 151302 प्राप्त तर 440 अप्राप्त आहेत. तसेच 135332 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.