उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात त्वरित पदनिर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:38 AM2021-04-03T04:38:50+5:302021-04-03T04:38:50+5:30

उमरखेड : येथील आर. पी. उत्तरवार कुटीर रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, तसेच त्वरित पदनिर्मिती करावी, अशी मागणी ...

Create immediate post in Umarkhed Sub-District Hospital | उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात त्वरित पदनिर्मिती करा

उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात त्वरित पदनिर्मिती करा

googlenewsNext

उमरखेड : येथील आर. पी. उत्तरवार कुटीर रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, तसेच त्वरित पदनिर्मिती करावी, अशी मागणी आमदार नामदेव ससाने यांनी केली.

रुग्णालयाचे बांधकाम आटोपले आहे. मात्र, हस्तांतरणाबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करून देखील अद्याप

हस्तांतरण झाले नाही. आता आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करावी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आमदार नामदेव ससाने यांनी दिला. उमरखेडची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आर. पी. उत्तरवार रुग्णालयात खाटांची संख्या वाढवून उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था व मनुष्यबळ उपलब्ध करावे. यासाठी आमदार ससाने यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांशी संपर्क साधून नवीन उपजिल्हा रुग्णालयात पदनिर्मिती करावी, अशी मागणी केली. या विधानसभा क्षेत्रातील काही गावे नागपूर-तुळजापूर महामार्गावर आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक आहे.

पैनगंगा अभयारण्यामुळे वन्यजीवांच्या हल्ल्यात नेहमी जखमी होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्व रुग्ण उपचारासाठी उमरखेडमध्ये दाखल होतात. मराठवाडा व विदर्भातील चार तालुके लगत असल्याने १०० ते १२५ गावातील रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी उमरखेड येथे येतात.

बॉक्स

रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात

पदनिर्मितीसंदर्भात १५ सप्टेंबर २०२० रोजी शासनासोबत पत्रव्यवहार झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याचे कळवले. तद्नंतर रुग्णालयाच्या इमारत हस्तांतरणाचे सोपस्कार पार पडणार आहेत. मात्र, आकृतीबंधानुसार अद्याप पदनिर्मिती झाली नाही. त्यामुळे त्वरित पदनिर्मिती करावी, अशी मागणी आमदारांनी प्रधान सचिवांकडे केली आहे.

Web Title: Create immediate post in Umarkhed Sub-District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.