पुसद जिल्हा निर्मितीचा बिगूल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 10:01 PM2018-09-09T22:01:49+5:302018-09-09T22:04:28+5:30

येथे विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात पुसद जिल्हा निर्मितीचा बिगुल वाजला. दोन्ही आमदारांनी पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

The creation of Pusad district was a big mistake | पुसद जिल्हा निर्मितीचा बिगूल वाजला

पुसद जिल्हा निर्मितीचा बिगूल वाजला

googlenewsNext
ठळक मुद्देविकासात राजकारण नाही : आमदारद्वय मिर्झा, नाईक यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथे विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात पुसद जिल्हा निर्मितीचा बिगुल वाजला. दोन्ही आमदारांनी पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
पुसद अर्बन बँकेतर्फे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य डॉ.वजाहत मिर्झा व अ‍ॅड.निलय नाईक यांचा साई मंगलम सभागृहात सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री डॉ.एन.पी.हिराणी होते. प्रथम पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्याहस्ते डॉ.वजाहत मिर्झा व अ‍ॅड.निलय नाईक यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ.मिर्झा म्हणाले, विकास कार्यात कदापिही राजकारण आडवे येणार नाही. रखडलेल्या उपक्रमांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
आमदार अ‍ॅड. निलय नाईक म्हणाले, माझ्या राजकीय २५ वर्षांच्या प्रवासात मला एकही पद देण्यात आले नाही. आपल्यावर सतत अन्यायच झाला. आता कोणत्याही दबावाचा आपल्यावर परिणाम होणार नाही. पुसद जिल्ह्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून विकास कार्यासाठी राजकारण विरहित काम करण्याची ग्वाही त्यांनीही दिली.
या कार्यक्रमाला माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, माजी आमदार विजय खडसे, बँकेचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड.आप्पाराव मैंद, तातू देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, वसंतराव पाटील, कान्हेकर, डॉ.अकील मेमन, प्रा.सुरेश गोफने, के.आय. मिर्झा, पंजाबराव देशमुख खडकेकर, विनोद जिल्हेवार, डॉ.मोहम्मद नदीम, अ‍ॅड.आशिष देशमुख यांच्यासह बँकेचे संचालक व मान्यवर उपस्थित होते.
पुसद अर्बन को-आॅप बँक परिवारातर्फे कुटुंबातील दोन सदस्यांचा हा सत्कार करण्यात आला. कुटुंबातील दोन सदस्य आपल्या कार्यकर्तृत्वाने आमदार झाल्याबद्दल त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे शरद मैंद यांनी सांगितले. संचालन मनीष अनंतवार यांनी केले. आभार बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा यांनी मानले.
तरुणांची जीवलग मैत्री
‘आपल्या भूमिपुत्रांचा व जिवलग मित्रांचा सत्कार’, असे नाव या कार्यक्रमाला देण्यात आले होते. त्यात शरद मैंद यांनी प्रास्ताविकातून जीवलग मित्रांचा सन्मान करण्याचे अहोभाग्य आपल्याला मिळाले, अशी भावना व्यक्त केली. याच कार्यक्रमातून आता पुसद जिलहा निर्मितीचा बिगुल वाजल्याने पुसद जिल्हा होण्याची शक्यता बळावली आहे.

Web Title: The creation of Pusad district was a big mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.