क्रिकेट सट्टाबाजाराचा खायवाड मार्इंदे चौकात

By admin | Published: May 29, 2016 02:30 AM2016-05-29T02:30:47+5:302016-05-29T02:30:47+5:30

इंडियन प्रिमीअर लिगचा हंगाम जोरात सुरू आहे. विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सट्टा यवतमाळातून लावला जातो.

Cricket Bandhara Khaywad at Marinde Chowk | क्रिकेट सट्टाबाजाराचा खायवाड मार्इंदे चौकात

क्रिकेट सट्टाबाजाराचा खायवाड मार्इंदे चौकात

Next

यवतमाळ : इंडियन प्रिमीअर लिगचा हंगाम जोरात सुरू आहे. विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सट्टा यवतमाळातून लावला जातो. सर्वाधिक उलाढाल येथील मार्इंदे चौकातून होत आहे. येथील खायवाड्याने ‘रान’ माजविले आहे. स्थानिक पोलीस आणि शोध पथके हितसंबंधामुळे मूकसंमती देत आहेत.
शहरातील भूमाफिया आणि मद्यसम्राट म्हणून लौकिक मिळवित असलेल्यानेच आपल्याच परिवारातील व्यक्तीला क्रिकेट सट्टा बाजारात उतरविले आहे. सत्तेतील पुढाऱ्यांशी असलेली सलगी, स्थानिक अधिकाऱ्यांशी जुळलेले हितसंबंध या जोरावर विदर्भात नागपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सट्टा यवतमाळातून लावला जातो.
जिल्ह्यातील वणी, पांढरकवडा, पुसद या प्रमुख तालुक्याच्या ठिकाणीही मार्इंदे चौकातील खायवाड्यासाठीच उतारा घेतला जातो. एकट्या यवतमाळ शहरात क्रिकेट मॅचवर उतारवाडी करणारे शंभरजण कार्यरत आहे. व्हाईट कॉलरचा पाठिंबा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची सलगी या जोरावर आपले आगळेवेगळे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पोलीस यंत्रणेतील सर्वांनाच याची खबर असली तरी, प्रत्यक्ष कारवाईसाठी कुणीही पुढे आले नाही. उलट या यंत्रणेतील काही महाभाग क्रिकेट सट्ट्यातही भागिदार असल्याचे सांगितले जाते.
क्रिकेट सट्ट्याच्या भरवशावर या खायवाडने दोन महिन्यांपूर्वी ६० लाख रुपये किमतीची आलिशान गाडीही विकत घेतली आहे. आपला आर्थिक विकास करत असतानाच गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके जमा करून ‘मसल पॉवर’ वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. ‘मसल पॉवर’च्या जोरावरच फोनवर लावलेल्या सट्ट्याची रक्कम वसूल केली जाते.
सट्टा बाजारात एकछत्री अंमल
शहरातील सर्वच अवैध धंद्यांमध्ये एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांना येनकेन प्रकारे मोडीत काढून आपले वर्चस्व स्थापन केले जात आहे. यामध्ये मद्यसम्राट आणि भूमाफिया असलेल्यांची आक्रमक भूमिका आहे. याच जोरावर क्रिकेट सट्टा बाजारातही एकछत्री अंमल तयार करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात इतर कोणी काम करू शकत नाही, अशी स्थिती आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Cricket Bandhara Khaywad at Marinde Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.