कोचिंग क्लास संचालकावर विनयभंगाचा गुन्हा
By Admin | Published: April 13, 2017 12:51 AM2017-04-13T00:51:39+5:302017-04-13T00:51:39+5:30
येथील राणा प्रताप गेटच्या आत डेहणकर कोचिंग क्लास नावाने कोचिंग क्लास चालविणारा शिक्षण मिलिंद डेहणकर
यवतमाळ : येथील राणा प्रताप गेटच्या आत डेहणकर कोचिंग क्लास नावाने कोचिंग क्लास चालविणारा शिक्षण मिलिंद डेहणकर याच्याविरूद्ध वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शिकवणीला येणाऱ्या मुलींना फोन करून नको ते बोलणे व अश्लिल मॅसेज पाठविणे, असे उपक्रम या शिक्षकाने चालविले होते. याबाबतची माहिती विद्यार्थिनींनी पालकांना दिल्यानंतर काही पालकांनी सदर कोचिंग क्लास गाठून मिलिंद डेहणकरला चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी पोलीस ठाणे गाठले असता ठाण्याच्या हद्दीचा प्रश्न पोलिसांनी निर्माण केला.
यामुळे दोन दिवस तक्रार होण्यास विलंब झाला. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित ठाणेदारांना खडे बोल सुनाविल्यानंतर वडगाव रोड पोलीस ठाण्यात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये सदर शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मिलिंद डेहणकर हा आरोपी फरार असल्याचे कळते. (प्रतिनिधी)