एसटी रोखणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 05:00 AM2021-11-03T05:00:00+5:302021-11-03T05:00:16+5:30

यवतमाळात प्रशांत यादव यांच्यासह २५ जणांनी बसस्थानकावर येऊन आगाराच्या मुख्य द्वारावर संप सुरू ठेवून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडविले. आगाराच्या गेटला कुलूप लावले, तसेच अनधिकृत इन-आऊट गेटवरून होणारी वाहतूक बंद केली, अशी तक्रार व्यवस्थापक रमेश उईके यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी कलम १४३, १४७, ३४१ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Crimes against ST blocking protesters | एसटी रोखणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे

एसटी रोखणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू होते. २८ ऑक्टोबर रोजी प्रशासनासोबत यशस्वी चर्चा झाल्याने एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने आंदोलन मागे घेतले; मात्र त्यानंतरही १ नोव्हेंबर रोजी यवतमाळ बसस्थानकावर व नेर येथे बसस्थानक परिसरात एसटी बस रोखण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी दोन्ही ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले. 
यवतमाळात प्रशांत यादव यांच्यासह २५ जणांनी बसस्थानकावर येऊन आगाराच्या मुख्य द्वारावर संप सुरू ठेवून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडविले. आगाराच्या गेटला कुलूप लावले, तसेच अनधिकृत इन-आऊट गेटवरून होणारी वाहतूक बंद केली, अशी तक्रार व्यवस्थापक रमेश उईके यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दिली. 
याप्रकरणी कलम १४३, १४७, ३४१ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नेर येथेसुद्धा दीप्ती नारायण वड्डे यांच्या तक्रारीवरून अनिल श्रीराम राठोड रा. बाणगाव याच्यासह पाच जणांविरुद्ध कलम ३४१, १८६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपींनी एसटी बस क्र. एम.एच.४०/एन.९६०२ अडवून टायरची हवा सोडली होती.
तीन आगार वगळता जिल्ह्यातील इतर आगारातील बससेवा सुरळीत झाली असली तरी अद्यापही गाड्यांची संख्या कमी असल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळी सुटीनिमित्त अनेक जण कुटुंबीयांसह गावाकडे जाण्यासाठी निघाले आहे. अशा प्रवाशांची कोंडी झाली आहे. 

तीन आगाराने केल्या केवळ १२ बसफेऱ्या 
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा सलग सहाव्या दिवशीही प्रभाव कायम होता. मंगळवारी सहा आगारातून बससेवा सुरळीत झाली आहे. तर तीन आगारात अद्यापही आंदोलनाची धग आहे. 
- मंगळवारी अवघ्या १२ बस गाड्याच या तीन आगारातून बाहेर पडल्या. पांढरकवडा आगारातून केवळ आठ फेऱ्या बाहेर पडल्या. नेर आणि राळेगाव या दोन आगारातून तर प्रत्येकी दोन बसफेऱ्या मार्गावर निघाल्या. या आगारातून महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. 
- ग्रामीण भागातील बसेस बंद असल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांनाही गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. कामगारांच्या या आंदोलनात भाजपही उतरली आहे. बसची हवा सोडण्याचे प्रकार करण्यासोबतच कामात अडथळा आणला जात आहे. अशा प्रकारच्या दोन तक्रारी यवतमाळ आणि नेर येथे दाखल झाल्या आहेत. यावरून यवतमाळ येथे २४, तर नेरमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Crimes against ST blocking protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.