शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:46 AM2021-08-25T04:46:55+5:302021-08-25T04:46:55+5:30
वीज वितरण कर्मचाऱ्याची तक्रार पांढरकवडा : वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा तसेच धक्काबुकी केल्याप्रकरणी तालुक्यातील घुबडी येथील ...
वीज वितरण कर्मचाऱ्याची तक्रार
पांढरकवडा : वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा तसेच धक्काबुकी केल्याप्रकरणी तालुक्यातील घुबडी येथील तिघांवर पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबाराव बावणे (४५), चंदाबाई बावणे (४०), संदेश बावणे (२२) सर्व रा. घुबडी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वीज वितरण कंपनीचे तंत्रज्ञ पंकज कुमार गेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते व त्यांचे सहकारी कर्मचारी सोमवारी सकाळी ९ ते १० च्या सुमारास बाबाराव बावणे यांच्या घरचा वीज पुरवठा मार्च महिन्यात बंद करण्यात आला होता. तो बंद आहे की सुरू आहे, हे तपासणी करण्याकरिता गेले असता, बाबाराव बावणे व इतर दोघांनी मिळून शिवीगाळ करून तसेच कॉलर पकडून धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली. त्यानुसार तीनही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३५३, २९४, ३३२, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.