ग्रामीण भागातील ऑटो व्यवसाय संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:46 AM2021-08-24T04:46:18+5:302021-08-24T04:46:18+5:30
गोदरीमुक्तीबाबत जनजागृतीची गरज पांढरकवडा : तालुक्यातील अनेक गावांत घरी शौचालय असूनही नागरिक गावातील मुख्य रस्त्यावरच शौचास जात असल्याचे चित्र ...
गोदरीमुक्तीबाबत जनजागृतीची गरज
पांढरकवडा : तालुक्यातील अनेक गावांत घरी शौचालय असूनही नागरिक गावातील मुख्य रस्त्यावरच शौचास जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने गोदरीमुक्त गावची प्रभावी जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच अनेकांनी शौचालय योजनेचा लाभ घेतला; परंतु या शौचालयाचा अनेक जण वापरच करत नसल्याने शासनाच्या स्वच्छता योजनेचाही फज्जा उडाला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
पांढरकवडा : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. शहरी असो वा ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातदेखील घडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन हे खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
विद्यार्थ्यांना मोफत नेट उपलब्ध करून द्या
मारेगाव : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये ऑनलाइन पध्दत्तीने सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त नेटची आवश्यकता असते. तसेच अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेटचा नियमित वापर करावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना नेटचा खर्च परवडत नाही. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत नेट उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
चिठ्ठीविनाच दिली जाते औषधी
मारेगाव : कोरोनाच्या काळात नागरिक डॉक्टरकडे जाण्याचे टाळायचे. मेडिकलमध्ये चिठ्ठीविना औषधाची खरेदी होत असे. आताही तीच स्थिती असून नागरिक चिठ्ठीविना अनेक औषधांची मागणी करीत असून दुकानदारही सर्रास औषध देत आहेत. त्यामुळे चुकीचे औषध अथवा हाय डोज औषध झाल्यास जिवावर बेतण्याची वेळ येऊ शकते. चिठ्ठीविना औषधी देणे नियमबाह्य असून अशा औषधी दुकानदारांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.