पारवा परिसरात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:40+5:302021-07-24T04:24:40+5:30
सततच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. कधी पावसाची हुलकावणी, ...
सततच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. कधी पावसाची हुलकावणी, तर कधी अतिवृष्टी, अशी अनेक संकट येत असल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. या वर्षी सोयाबीन व कपाशीचे पीक जोमदार असताना, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून अक्षरशः शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
बॉक्स
नैसर्गिक संकट पाचवीलाच पुजलेले
दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक शेतकरी त्यावर आत्महत्येचा मार्ग निवडत आहे. त्यामुळे नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी रिपाइंने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनावर रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाठोरे, शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, समाधान केवटे, प्रा.अंबादास वानखेडे, कैलास श्रावणे, प्रेम ठोके, प्रकाश धुळे, जयराम माथने, दिलीप धुळे, संजय चव्हाण, प्रभू केवटे आदींच्या स्वाक्षरी आहेत.