कोटी ओतले, तरी पाणी कुठे मुरले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:02 PM2019-02-24T22:02:03+5:302019-02-24T22:02:43+5:30

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

Crores pour, but where did the water fade? | कोटी ओतले, तरी पाणी कुठे मुरले?

कोटी ओतले, तरी पाणी कुठे मुरले?

Next
ठळक मुद्देजलयुक्तच्या कामावर प्रश्नचिन्ह : उन्हाळ्यापूर्वीच भूजल पातळी अर्धा मीटर घटली

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामुळे कोट्यवधी रूपये खर्च केलेल्या अभियानात तांत्रिक अडचणी तर राहिल्या नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपये ओतूनही प्रशासनात कुठेतरी पाणी मुरल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
यवतमाळ जिल्हा सतत दुष्काळी स्थितीचा सामना करत आहे. यावर्षीही जिल्ह्यात अपुरा पाऊस पडला. यामुळे भूजल पातळी अर्ध्या मिटरने खाली गेली आहे. उन्हाळ्याचे तीन महिने पुढे आहेत. अशात भूजल पातळी अर्ध्या मिटरने खाली आली आहे. पुढील काळात ही भूजलपातळी आणखी खाली जाण्याचा धोका आहे.
जिल्ह्यात यावर्षी ७०० एमएम इतका पाऊस झाला. पडलेला पाऊस डोंगरमाथ्यावरून सरळ खाली वाहून गेला. पडलेले पाणी काही प्रमाणात साठविल्या गेले. मात्र ते पाणी जमिनीत मुरले नाही. यामुळे संपूर्ण जिल्हा आज दुष्काळाच्या सावटात आहे.
जलयुक्त शिवार योजनेचे काम जिल्ह्यातील अनेक भागात पार पडले. ज्या भागात हे कामकाज घेण्यात आले. त्या ठिकाणी याचा फारसा प्रभाव दिसत नाही. यामुळे जलयुक्त शिवार योजनेत खोदण्यात आलेले शेततळे तंत्रशुद्ध पद्धतीने झाले नव्हते काय, नदीपात्र आणि नाल्यांच्या रूंदीकरणासोबत डोंगरमाथ्यावरचे कामकाजही मोठे आहे. असे असतानाही भूजल पातळीत वाढ झाली नाही. उलट दरवर्षीच त्यामध्ये घट नोंदविली जात आहे. यामुळे कोट्यवधी रूपयांच्या खर्चानंतरही भूजल पातळीत सुधारणा न झाल्याने दुष्काळी उपाययोजना राबवाव्या लागणार आहे.

हरियाली, वॉटरशेड प्रकल्पाचे काय झाले?
जलयुक्त शिवार अभियानापूर्वी हरियाली योजना राबविली गेली. वॉटर शेड प्रकल्पाअंतर्गत डोंगराच्या पायथ्याशी आडवे चर खोदण्यात आले. डोंगरावर पाणी मुरविण्याचे काम वर्षानुवर्षे राबविले जात आहे. यानंतरही भूजलस्त्रोत चिंताजनक आहे. यामुळे सिंचन समृद्धीला बे्रक लागला आहे.

Web Title: Crores pour, but where did the water fade?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.