क्रॉस वोटिंगचा धोका

By admin | Published: January 21, 2016 02:15 AM2016-01-21T02:15:25+5:302016-01-21T02:15:25+5:30

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याचा धोका वाढला आहे.

Cross voting risk | क्रॉस वोटिंगचा धोका

क्रॉस वोटिंगचा धोका

Next

यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याचा धोका वाढला आहे. हा पक्रार टाळण्यासाठी पॅनलचे प्रमुख आणि उमेदवारांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहे. अगदी चार दिवसांवर येवून ठेपलेल्या या निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा विषय चांगलाच चर्चिला जात आहे.
राजुदास जाधव अध्यक्ष असलेल्या या संस्थेचे सात हजार ७०० मतदार आहेत. १५ वर्षांपूर्वी ३३ कोटी रुपये उलाढाल असलेली ही संस्था आज ६०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर पोहोचली आहे. मागील काही वर्षात संस्थेने विविध क्षेत्रात साधलेली प्रगती लक्षणीय आहे. अशा या संस्थेचे प्रतिनिधित्व करता यावे यासाठी प्रामुख्याने यावेळच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. दोन पॅनलचे ३४ आणि इतर नऊ, असे ४३ उमेदवार रिंगणात आहे.
राजुदास जाधव यांच्या नेतृत्त्वातील सहकार पॅनल आणि मधुकर काठोळे यांच्या पुढाकारातील महासमन्वय पॅनल यांच्यात थेट सामना होत आहे. मात्र गेली काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे क्रॉस वोटिंगची संख्या वाढण्याची शक्यता बळावली आहे. सहकारात साधारणत: एकाच पॅनलच्या बाजूने मतदान होते. आतापर्यंतचा या संस्थेच्या निवडणुकीतीलही हाच अनुभव आहे. यावेळी मात्र वेगळे चित्र समोर येत आहे. मतदानासाठी वैयक्तिक उमेदवाराला पसंती देण्याची शक्यता वाढली आहे. या संस्थेचा मतदार शिक्षक आणि कर्मचारी हा बुध्दीजीवी वर्ग असल्याने ते योग्य उमेदवारांचीच निवड करतील, यात शंका नाही. याशिवाय जो उमेदवार विजयाच्या जवळपास पोहोचू शकतो, त्यालाच पसंती दिली जावू शकते.
मतदानाचा कालावधी जसजसा जवळ येत आहे, तसतशी रंगत वाढत आहे. आमची उमेदवारी आणि पॅनल कसे सक्षम आहे, याविषयीचे दावे केले जात आहे. आपल्याकडे एवढ्या संघटना आहे, त्यांची मतदारसंख्या एवढी आहे, असे सांगून विजयाचे गणित मांडले जात आहे. यासोबतच क्रॉस वोटिंग होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. दरम्यानच्या काळातच काही लोकं पॅनल बाजूला ठेवत स्वत:साठी मते मागत असल्याच्या बाबीही चर्चिल्या जात आहेत. त्यामुळेही क्रॉस वोटिंग वाढण्याची शक्यता आहे. मात्र कॅडर बेस मतदारांमधून असा प्रकार होणार नाही, असेही ठामपणे सांगितले जात आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Cross voting risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.