रमजानच्या पर्वावर बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:26 PM2018-06-15T22:26:27+5:302018-06-15T22:26:27+5:30
इस्लाम धर्माचे सर्वात मोठे पर्व रमजानचे आहे. यामध्ये रमजान ईदला सर्वाधिक महत्व आहे. या पर्वाकरिता शहराची बाजारपेठ सजली आहे. या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : इस्लाम धर्माचे सर्वात मोठे पर्व रमजानचे आहे. यामध्ये रमजान ईदला सर्वाधिक महत्व आहे. या पर्वाकरिता शहराची बाजारपेठ सजली आहे. या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे.
शहरासोबत संपूर्ण जिल्ह्यात ईदची तयारी मोठ्या उत्साहात झाली आहे. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मोठे गर्दी उसळली होती.
शहरातील प्रत्येक मशिदीमध्ये रमजान महिन्यात विशेष नमाज नियमित अदा करण्यात आली. या महिन्यात रोजा ठेवण्यात आला. रात्री तरावीहची नमाज, कुरान तिलावत करण्यात आली.
सामंजस्य आणि विश्वशांतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करण्यात आली. जकात, दानधर्म, ईश्वराचे आभार, आदी गोष्टींना प्राधान्य देण्यात येते. एकंदरीत पुण्यकार्य करण्याला प्राधान्य देण्यात येते. यामुळे या महिन्याला नेकी और इबादतचा महिना म्हणूनही संबोधले जाते. या महिन्यात कुरानचे पठण करण्याला सर्वाधिक महत्व देण्यात आले आहे.
१९९५ पासून अविरत ‘सहेरी’चा उपक्रम
रमजानमध्ये उपवास करताना सूर्योदयापूर्वी अन्न ग्रहण केले जाते. दिवसभर उपवास केला जातो. त्याला रोजा असे म्हटले जाते. यवतमाळात मुस्लिम बांधवांनी सहेरीचे आयोजन केले आहे. या ठिकाणी बाहेर ठिकाणावरून येणाऱ्या बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते. १९९५ पासून हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जातो. यासाठी सर्वच समाज बांधवांचे मोलाचे योगदानही मिळते. कळंब चौकातील शाहीन हॉलमध्ये सहेरीचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी शेकडो समाजबांधव अहोरात्र झटत आहेत. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहेरी कमेटीचे अध्यक्ष सैयद नदीम सैयद रियाज, उपाध्यक्ष नवेद अहेमद, सचिव सै. असरार, सै. नूर, संचालक अफजल मोहम्मद अकबर, फैसल बेग, अनिस मम्मा, शकिल अहमद यांच्यासह अनेक जण काम करीत आहेत.