सेवानिवृत्त जमादाराच्या मुलाचा निर्घृण खून

By Admin | Published: February 6, 2017 12:09 AM2017-02-06T00:09:06+5:302017-02-06T00:09:06+5:30

सेवानिवृत्त जमादाराच्या मुलाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्याची घटना येथील वडगाव रोडच्या वडारवाडी परिसरात

The cruelty of a retired banker's son | सेवानिवृत्त जमादाराच्या मुलाचा निर्घृण खून

सेवानिवृत्त जमादाराच्या मुलाचा निर्घृण खून

googlenewsNext

दोघांना अटक : वडगाव रोड येथील घटना
यवतमाळ : सेवानिवृत्त जमादाराच्या मुलाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्याची घटना येथील वडगाव रोडच्या वडारवाडी परिसरात शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासात दोनही आरोपींना अटक केली आहे. दारूच्या वादात चाकू हल्ला केल्याचे आरोपींनी सांगितले.
स्वप्नील धनंजय ढाकरगे (२५) रा. नेताजीनगर असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी गौरव सुभाष मानेकर (२५) रा. आर्णी रोड आणि आशिष प्रभाकर गजभिये (३२) रा. राऊतनगर यांना पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव रोडच्या वडारवाडी परिसरात शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास स्वप्नीलवर या दोघांनी चाकूने हल्ला केला आणि आरोपी आॅटोरिक्षाने पसार झाले. स्वप्नील रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. तो मदतीसाठी बराच वेळ धडपडत होता. मात्र कुणीही मदत केली नाही. अखेर त्याची मामे बहीण संगीता रवींद्र वानखडे घटनास्थळी आली. तिला स्वप्नीलने गौरव व आशिषने चाकू हल्ला केल्याचे सांगितले. त्यानंतर संगीताने स्वप्नीलला आॅटोरिक्षातून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र अतिरक्तस्त्रावाने स्वप्नीलचा मृत्यू झाला. या घटनेने वडारवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांना या घटनेची माहिती होताच त्यांनी घटनास्थळ गाठले.
या प्रकरणी संगीताच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. वडगाव रोडचे प्रभारी ठाणेदार सारंग मिराशी यांनी रात्रीच आरोपींचा शोध सुरू केला. रविवारी दुपारी आरोपी आशिष गजभिये व गौरव मानेकर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी सुरू असून दारुच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. या कारवाईत वडगाव रोड ठाण्यातील कर्मचारी नीलेश राठोड, सुरेश मेश्राम, प्रमोद मडावी, बबलू चव्हाण, प्रशांत गेडाम, रावसाहेब शेंडे, आशिष चौबे सहभागी झाले होते. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी चालविली असून अटकेतील आरोपींची पोलीस कोठडी घेतली जाणार आहे. त्यातून या खुनाचे खरे कारण पुढे येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
 

Web Title: The cruelty of a retired banker's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.