मांडवा येथे शेतकऱ्यांना लागवडीचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:38+5:302021-06-19T04:27:38+5:30
पुसद : तालुक्यातील मांडवा येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प व उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बियाणे लागवड पूर्व प्रशिक्षण देण्यात ...
पुसद : तालुक्यातील मांडवा येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प व उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बियाणे लागवड पूर्व प्रशिक्षण देण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकावर होणारा बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कमी कालावधीच्या वाणाची लागवड करण्याचे आवाहन केले. स्मार्ट कॉटन प्रकल्पातील प्रत्येक शेतकऱ्याने एकाच वाणाची लागवड केल्यास एका विशिष्ट प्रकारचा स्मार्ट कॉटन ब्रँड तयार होतो. त्यापासून शेतकऱ्यांना होणारे लाभ, याचीही त्यांनी माहिती दिली. तसेच बियाणे अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करून पक्के बिल घ्यावे, कापूस पिकाची लागवड व इतर पिकांची लागवड आणि पेरणी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय करू नये, असे आवाहन केले.
यावेळी पोलीस पाटील दत्तराव पुलाते, आत्माचे एस.डी. मोरे, कृषी सहाय्यक एस.पी. जाधव, सोसायटी अध्यक्ष वसंता आडे, ग्रामपंचायत सदस्य गोपाल मंदाडे, सचिन पोंगाडे, बाळू धाड, कृषी समन्वयक बाळू पुलाते, दैवशाला डोळस, जयश्री मंदाडे, बँक सखी निकिता घुक्से, ग्राम संघ अध्यक्ष कालंदा घुक्से, ग्यानबा आबाळे, बळीराम आबाळे, सुदाम ढोले, श्रीराम पुलाते, रमेश ढोले, कैलास राठोड, गोविंदा आबाळे, उत्तम पुलाते, मंगू राठोड, विठ्ठल आडे, उकंडा मंदाडे, बजरंग पुलाते, देविदास गजभार, गजानन आबाळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.