सांस्कृतिक कार्यक्रमांची होती वर्षभर रेलचेल

By admin | Published: December 30, 2015 03:00 AM2015-12-30T03:00:45+5:302015-12-30T03:00:45+5:30

सांस्कृतिक चळवळीत सदैव अग्रेसर असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल होती.

The cultural program was a year-long trip | सांस्कृतिक कार्यक्रमांची होती वर्षभर रेलचेल

सांस्कृतिक कार्यक्रमांची होती वर्षभर रेलचेल

Next

संगीताच्याही मैफल : समतापर्व आणि स्मृतिपर्वातून वैचारिक मेजवाणी
यवतमाळ : सांस्कृतिक चळवळीत सदैव अग्रेसर असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल होती. राज्य नाट्यस्पर्धेसाठी सात नाटकांची निवड यवतमाळच्या नाट्य चळवळीला बळ देणारी ठरली. तर समतापर्व आणि स्मृतीपर्वातून यवतमाळकरांना सरत्या वर्षाने वैचारिक मेजवाणी दिली.
सुप्रसिद्ध गायक भीमराव पांचाळे यांच्या ‘शब्द सुरांच्या भाव यात्रे’ने सरत्या वर्षाची सुरूवात झाली होती. विदर्भ युवा विकास मंचच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाने श्रोत्यांवर स्वरांची जादुई बरसात केली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृती देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धा येथील ‘प्रेरणास्थळा’वर आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीचे स्फुलिंग चेतविले. सरत्या वर्षाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यवतमाळकरांना शिवकाळात घेऊन जाणारे शिवकालिन शस्त्र प्रदर्शन होय. यवतमाळच्या गुरूदेव मंगल कार्यालयात गिरीश जाधव यांच्या संग्रहातील शस्त्रात्रांचे प्रदर्शन मेजवानी ठरले.
सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळीला बळ देणाऱ्या समता पर्वाची यवतमाळकर वर्षभर वाट पहात असतात. सरत्या वर्षात एप्रिल महिन्यात महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समता पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. सफाई कामगार आंदोलनाचे नेते बेजवाडा विल्सन यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले. समता पर्वातील यवतमाळ आयडॉलने नवोदित गायकांचा शोध घेतला. चित्रपटसृष्टीशी सरत्या वर्षाने नाते जोडले. शेतकरी आत्महत्यांवर आधारित आत्मदाह हा चित्रपट प्रदर्शित झाला. कलावंत आणि छायाचित्रणही यवतमाळ जिल्ह्यातच झाले. या चित्रपटाने शेतकरी आत्महत्यांवर प्रकाश टाकून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले. महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिपर्वाचे आयोजन यवतमाळकरांना वैचारिक मेजवानी देणारे ठरले. विविध विषयांवर या स्मृतीपर्वात मंथन झाले.
यवतमाळ ही हौशी कलावंतांची नगरी आहे. या नगरीने अनेक नाट्यकलावंत दिले आहेत. अशाच या यवतमाळ नगरीतील एक-दोन नव्हे तर तब्बल सात नाटके राज्य स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात ‘व्वा! वाटेल ते प्रेमासाठी’, ‘अभिनेत्री’, ‘तप्त दहाही दिशा’, ‘खेळ’, ‘आसूरबा’, ‘माझा खेळ मांडू दे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ ही नाटके चंद्रपूरच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत सहभागी झाली होती. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The cultural program was a year-long trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.