ग्राहकांनो, चुकले तर फिक्स डिपॉझिटला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:01:12+5:30

अत्यंत सुरक्षित असलेली ही रक्कम हॅकर बँकेतून परस्पर उडवित आहे. त्यामुळे फिक्स डिपॉझिट रक्कमही असुरक्षित झाली आहे. परंतु जोपर्यंत बँक खातेदार एखादी चूक करीत नाही, तोपर्यंत कोणताही हॅकर परस्पर एफडी तोडू शकत नाही, असा दावा बँक अधिकाऱ्यांनी केला आहे. अनोळखी व्यक्तीकडून फोन कॉल येणे, त्यावर बँक खात्याची माहिती विचारुन परस्पर रक्कम उडविणे हे प्रकार अनेकदा घडत आहे.

Customers, if you make a mistake, leave a fixed deposit | ग्राहकांनो, चुकले तर फिक्स डिपॉझिटला मुकले

ग्राहकांनो, चुकले तर फिक्स डिपॉझिटला मुकले

Next
ठळक मुद्देनेट बँकींगचा गैरफायदा : डिपॉझिटवर टपले हॅकर, फोन कॉल्सला बळी पडू नका, खात्याची माहिती देऊ नका

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आयुष्यातली सपूर्ण जमापुंजी एखाद्या महत्वाच्या गरजेसाठी बँकेत ‘फिक्स डिपॉझिट’ केली जाते. मात्र आता या ठेवीवरही चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आहे. अत्यंत सुरक्षित असलेली ही रक्कम हॅकर बँकेतून परस्पर उडवित आहे. त्यामुळे फिक्स डिपॉझिट रक्कमही असुरक्षित झाली आहे. परंतु जोपर्यंत बँक खातेदार एखादी चूक करीत नाही, तोपर्यंत कोणताही हॅकर परस्पर एफडी तोडू शकत नाही, असा दावा बँक अधिकाऱ्यांनी केला आहे.
अनोळखी व्यक्तीकडून फोन कॉल येणे, त्यावर बँक खात्याची माहिती विचारुन परस्पर रक्कम उडविणे हे प्रकार अनेकदा घडत आहे. बचत खाते, चालू खात्यातून अशा प्रकारच्या अपहाराच्या घटना आता नवीन राहिलेल्या नाही. मात्र जिल्ह्यात चक्क फिक्स डिपॉझिटमधील रक्कम उडविण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. बँक खात्याचे व्यवहार ऑनलाईन असले तरी फिक्स डिपॉझिटची रक्कम हा व्यवहार अशा खात्याशी ‘कनेक्ट’ नसतो. तरीही एफडीमधील रक्कम चोरट्यांनी कशी उडविली, याबाबत बँकींग क्षेत्रही चिंतेत पडले आहे.
‘लोकमत’ने या संदर्भात बँक अधिकाऱ्यांकडून सखोल माहिती घेतली. त्यावेळी बहुतांश अधिकाºयांनी सांगितले की, फिक्स डिपॉझिटमधील रक्कम चोरीस जाणे शक्यच नसल्याचा दावा केला. मात्र स्वत: बँक खातेदारांनी अज्ञात चोरट्याकडे एखादी माहिती चुकून का होईना शेअर केली तर चोरटा फिक्स डिपॉझिटची रक्कमही सहज उडवू शकतो. स्टेट बँक ऑफ इंडियाचे डिस्ट्रीक्ट चिफ मॅनेजर (सेल्स) अरुण अटकलीकर, एक्सीस बँकेचे व्यवस्थापक उमेश गाडोदिया, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मधुकर साळवे, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक दीपक कामडी आणि लिड बँकेचे व्यवस्थापक सचिन नारायणे म्हणाले, बँकेकडे फिक्स डिपॉझिट ठेवणारा ग्राहक स्वत:च ती एफडी तोडू शकतो. त्याच्याशिवाय इतर कुणीही त्यात हस्तक्षेपसुद्धा करू शकत नाही. कारण ही रक्कम ऑफलाईन असते. ऑफलाईन एफडी करताना ग्राहकाला पावती (एन्डोसमेंट) दिली जाते. या पावतीच्या मागे संबंधित अधिकारी व ग्राहकाची सही असते. ही सही जर चोरट्याने मिळविली तरच तो एफडीची रक्कम चोरु शकतो. त्यामुळे पावती किंवा पावतीवरील स्वाक्षरी शेअर करू नये.
शिवाय एखाद्या ग्राहकाने ऑनलाईन पद्धतीने एफडी केली तरी अशा खात्याला हायप्रोफाईल पासवर्ड असतो. ही रक्कम काढतानाही ओटीपी आवश्यक असतो. याशिवायही फिक्स डिपॉझिटला ‘सेक्युरिटी लेअर’ भरपूर असतात. या संबंधातील माहिती ग्राहकाने दुसºयाला सांगितली नाही तर यातून चोरी अशक्यच आहे.

लॉकडाऊनमध्ये बँक व्यवहार येताहेत हळूहळू पूर्वपदावर
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. मात्र बँक व्यवहार सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाºयांचे आदेश होते. त्यातही काही निर्बंध होते. जिल्हाधिकाºयांच्या २० मेच्या आदेशानुसार बँकांना केवळ ‘रक्कम जमा करणे आणि रक्कम विड्रॉल करणे’ एवढ्या दोनच सुविधा ग्राहकांना पुरविण्याच्या सूचना होत्या. मात्र आता हळूहळू बँकांचे सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे डिस्ट्रीक्ट चिफ मॅनेजर (सेल्स) अरुण अटकलीकर म्हणाले, आम्ही बँकेत आलेल्या कुणालाही नाही म्हणत नाही, सर्वच कामे करीत आहोत. कर्जदारांना तर एसएमएस पाठवून सूचना दिली जात आहे. सरकारनेही आता सर्व व्यवहार अनलॉक करणे सुरु केले आहे. त्यामुळे बँकांही ‘फुलफ्लेज’ सुरू आहे. फक्त पासबुक एन्ट्रीबाबत काही मर्यादा आम्ही ठेवत आहोत. पंजाब नॅशनल बॅँकेचे व्यवस्थापक दीपक कामडी, लिड बॅँकेचे प्रभारी व्यवस्थापक सचिन नारायणे, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे म्हणाले, आता बँकेचे सर्व व्यवहार सुरू झाले आहे. क्रॉप लोनचे काम सुरू आहे. ग्राहकांना आरटीजीएस, एनईएफटीसह पैसे ट्रान्सफर करता येतात.

ग्राहकांना रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करण्याची सुविधा
फेक कॉल करून बँक खात्यातील रक्कम किंवा फिक्स डिपॉझिटमधील रक्कम चोरली गेली तर फसवणूक झालेला खातेदार सर्व प्रथम पोलीस ठाणे, सायबर सेलकडे धाव घेतो. मात्र अशा प्रकरणात ‘आरबीआय अ‍ॅम्बुजमेंट अ‍ॅक्ट’अंतर्गत बँकेकडे तक्रार करता येते. बँक शाखेने यात एका महिन्याच्या आत समस्या निवारण करणे अपेक्षित आहे. मात्र तसे न झाल्यास एक महिन्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून संबंधित बँक शाखेकडे या तक्रारीबाबत पाठपुरावा सुरू केला जातो, अशी माहिती लिड बॅँकेचे प्रभारी व्यवस्थापक सचिन नारायणे यांनी दिली.

अशी करा ‘एफडी’ची सुरक्षा
1फिक्स डिपॉझिट ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन पद्धतीने केले जाते. आपली एफडी ऑनलाईन पद्धतीने, नेट बँकींगद्वारे केलेली असल्यास त्याचा पासवर्ड, ओटीपी, पीन कुणालाही सांगू नये.
2एफडी जर तुम्ही स्वत: बँकेत जाऊन ऑफलाईन पद्धतीने केलेली असेल तर त्यावेळी मिळालेली पावती (एन्डोसमेंट) आणि त्यावरील स्वाक्षरी कुणालाही शेअर करू नये.
3आपल्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्या सीम कार्डबद्दल कुणीही फोन केल्यास बँक खात्याशी संबंधित माहिती देऊ नये. कारण हा नंबर हॅक करुनच खात्यातील रकमेवर चोरटा हात मारू शकतो.

Web Title: Customers, if you make a mistake, leave a fixed deposit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक