वीज बिलासाठी ग्राहकांची आॅनलाईनला पसंती

By admin | Published: June 3, 2016 02:27 AM2016-06-03T02:27:30+5:302016-06-03T02:27:30+5:30

वीज वितरण कंपनीने बिल भरण्यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून वेळेची आणि पैशाची बचत होत असल्याने

Customers' online likes for electricity bills | वीज बिलासाठी ग्राहकांची आॅनलाईनला पसंती

वीज बिलासाठी ग्राहकांची आॅनलाईनला पसंती

Next

पुसद : वीज वितरण कंपनीने बिल भरण्यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून वेळेची आणि पैशाची बचत होत असल्याने वीज ग्राहक आॅनलाईन सुविधेचा वापर करीत असल्याचे पुसद शहरात दिसत आहे. शहरातील सुमारे तीन ते चार हजार ग्राहक या सेवेचा लाभ घेत आहे.
पुसद शहरासह श्रीरामपूर परिसरात वीज वितरणचे सुमारे ४० हजार ग्राहक आहे. सध्या तीन ते चार हजार ग्राहक आॅनलाईन सुविधेचा लाभ घेत आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. वीज वितरण कंपनी दरमहा ग्राहकांना बिल देते. बिल प्राप्त झाल्यानंतर वीज बिल भरणा केंद्रावर रांगेत उभे राहावे लागते. कार्यालय बंद असल्यास ग्राहकांना दंडही सोसावा लागतो. हा प्रकार टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीने माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. ग्राहकांना घर बसल्या, सायबकॅफे किंवा स्वत:च्या मोबाईलवरूनही बिल भरणे सोपे झाले आहे. मात्र अनेक ग्राहकांना वीज बिल कसे भरावे, याबाबत पुरेशी माहिती नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीने ग्राहकांसाठी प्रशिक्षण आयोजित करावे, अशी मागणी होत आहे.
कोणत्याही वेळेत बिल भरणे शक्य होते. सुट्या पैशाचा त्रासही होत नाही, असे वीज ग्राहक सुनील दातीर यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Customers' online likes for electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.