रानडुकराच्या हल्ल्यात दहेलीचा शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:15 PM2018-03-16T23:15:34+5:302018-03-16T23:15:34+5:30

दारव्हा आणि बाभूळगाव तालुक्यात शुक्रवारी रानडुकराने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी ठार, तर तीन जण जखमी झाले.

Dahle's farmer killed in Randuq's attack | रानडुकराच्या हल्ल्यात दहेलीचा शेतकरी ठार

रानडुकराच्या हल्ल्यात दहेलीचा शेतकरी ठार

Next
ठळक मुद्देतीन जखमी : दारव्हाच्या अंबिकानगरात शिरलेले डुक्कर पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा/बाभूळगाव : दारव्हा आणि बाभूळगाव तालुक्यात शुक्रवारी रानडुकराने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी ठार, तर तीन जण जखमी झाले. रानडुकरांच्या हैदोसामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर दहशतीत सापडले आहे.
बाबाराव रामजी राठोड (५०) रा. दहेली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दहेली येथील बाबाराव राठोड रामगाव शिवारातील शेतातून बैल चारण्याकरीता गेले होते. झुडपात लपून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. गावकºयांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी शेताकडे धाव घेतली. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून बाबाराव राठोड यांना दारव्हा येथे उपचारासाठी आणण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दुसºया घटनेतील दारव्हा तालुक्यातील उमरी येथील शेतकरी नारायण राठोड (५८) रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. ते शेतात कपाशी काढण्यासाठी गेले असताना रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सायंकाळी ५ वाजतच्या सुमारास एका रानडुकराने दारव्हा शहरातही धुमाकूळ घातला. शहरातील अंबिकानगरात घुसलेल्या रानडुकराने एका महिलेला जखमी केले. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. नागरिक सैरावैरा पळत होते. या घटनेची वनविभागाला माहिती कळताच वनविभाग व पोलीस अधिकारी ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. संतोष पवार, सुधीर पवार व त्यांच्या दोन सहकाºयांनी नागरिकांच्या मदतीने जीव धोक्यात घालून रानडुकराला पकडले.
बाभूळगावात वृद्ध जखमी
शुक्रवारी दुपारी एक रानडुकर बाभूळगाव शहरातील शिवाजी चौकात घुसले. तेथे बसून असलेल्या जगन मंगल खडसन (६०) यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर रानडुकर वाट मिळेल तिकडे पळत सुटले. या गडबडीत अनेक दुचाकीस्वार खाली पडले. एका रानडुकराने अंगणात बांधून असलेल्या वासरालाही जखमी केले. अखेर सावंगी रस्त्याने पळत जाणारे रानडुकर शेतशिवारात निघून गेले. जखमी खडसन यांच्या छाती, हात, पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना प्रथम बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालय व नंतर यवतमाळ येथे हलविण्यात आले.
रानडुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश
दारव्हा तालुक्यात रानडुकराने धुमाकूळ घातला असून आठवडाभरात तिघांवर हल्ला झाला. यात दोघांना जीव गमवावा लागला. या घटनेची दखल घेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी मुख्य वनसंरक्षक व वन अधिकाºयांना या रानडुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. सध्या ना. राठोड विधिमंडळाच्या अधिवेशनात व्यक्त आहे. मात्र घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माहिती दिली. तसेच यवतमाळ येथील वन विभागाच्या अधिकाºयांनी तत्काळ दारव्हा येथे भेट परिस्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले.

Web Title: Dahle's farmer killed in Randuq's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.