शेलोडी येथील शेतपिकांचे पुलाच्या कामामुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:42+5:302021-06-19T04:27:42+5:30
दारव्हा : तालुक्यातील शेलोडी येथे निर्माणाधीन पुलाचे पाणी शेतात शिरल्याने कपाशीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने झालेल्या ...
दारव्हा : तालुक्यातील शेलोडी येथे निर्माणाधीन पुलाचे पाणी शेतात शिरल्याने कपाशीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
शेलोडी येथील रामभाऊ परसराम पाटील यांनी आपल्या शेतात ३ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली आहे. आता अंकुर फुटून चांगली उगवण झाली होती. परंतु यवतमाळ मार्गावरील निर्माणाधीन पुलाचे पाणी शेतात शिरल्याने पीक वाहून गेले. या पुलाचे काम अर्धवट आहे. अशावेळी पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असताना कंत्राटदाराने केवळ दोन बंब टाकले. त्यामुळे पाण्याचा नीट विसर्ग न होता ओव्हर फ्लो होऊन शेतात शिरल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी रामभाऊ पाटील यांनी उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.