हजरत नोमानी यांच्या समर्थनार्थ धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:18 AM2018-03-24T00:18:34+5:302018-03-24T00:18:34+5:30

समतेचा विचार समाजात पोहोचविण्याचे काम करत असलेले हजरत मौलाना सज्जाद नोमानी यांच्या समर्थनार्थ येथे भारत मुक्ती मोर्चातर्फे धरणे देण्यात आले.

Damage in support of Hazrat Nomani | हजरत नोमानी यांच्या समर्थनार्थ धरणे

हजरत नोमानी यांच्या समर्थनार्थ धरणे

googlenewsNext
ठळक मुद्देभारत मुक्ती मोर्चा : गुन्हे मागे घेण्याची मागणी, षडयंत्राचा आरोप

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : समतेचा विचार समाजात पोहोचविण्याचे काम करत असलेले हजरत मौलाना सज्जाद नोमानी यांच्या समर्थनार्थ येथे भारत मुक्ती मोर्चातर्फे धरणे देण्यात आले. नोमानी यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
हजरत नोमानी यांनी हैदराबाद येथे केलेल्या वक्तव्याने देशाची एकता धोक्यात येऊ शकते, असे मत वसीम रिझवी यांनी व्यक्त करत नोमानी यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता वसीम रिझवी प्रणित कार्यकर्त्यांकडून दबावतंत्राचा वापर केला गेला. हजरत नोमानी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. नोमानी यांच्या समर्थनार्थ धरणे देऊन त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला.
धरणे कार्यक्रमात भारत मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाध्यक्ष विजयराज शेगेकर, मौलाना मनसूरभाई खान, विलास गायकवाड, विनोद डवले, रामचंद्र मरकाम, हिंमत भगत, प्रभाकर सावळे, संदीप मून, गजानन परडखे, कुणाल वासनिक, के.एन. मोरे, प्रा. कांतीकुमार झामरे, अरुण गोसावी, शेळके, हरिश राऊत, मौलाना मुफ्ती अबीद साहब, शेख सकिना, प्रशांत मुनेश्वर, कुंदा मडावी, विकास इंगोले, शिवाजी मेश्राम, धनराज चव्हाण, सारिका भगत, गजानन लेनगुरे, अ‍ॅड. अनिल किनाके, अब्दुल लतिफ, सुनीता पोपटकर, चित्रा खरे, करुणा भोयर, इंदू मोहर्लीकर, अर्चना कयापाक, धर्मशीला वाकोडे, डॉ. गुंजा कांबळे, कल्पना गायकवाड, नंदा वाकोडे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Damage in support of Hazrat Nomani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.