दुष्काळग्रस्तांसाठी ‘दान महोत्सव’

By admin | Published: April 9, 2016 02:41 AM2016-04-09T02:41:13+5:302016-04-09T02:41:13+5:30

गुढीपाडव्याच्या दिवशी यवतमाळकरांनी दुष्ककाळग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘दान महोत्सव’ हा उपक्रम राबविला.

'Dan Mahotsav' for drought-hit people | दुष्काळग्रस्तांसाठी ‘दान महोत्सव’

दुष्काळग्रस्तांसाठी ‘दान महोत्सव’

Next

कपड्यांची मदत : गुढीपाडव्याला यवतमाळात सरसावले शेकडो हात
यवतमाळ : गुढीपाडव्याच्या दिवशी यवतमाळकरांनी दुष्ककाळग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘दान महोत्सव’ हा उपक्रम राबविला. तब्बल दीड हजार नागरिकांनी कपड्यांचे दान करून मदतीचा हात पुढे केला. दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी समाज खंबीरपणे उभे असल्याचा संदेश यातून देण्यात आला. हे कपडे बिड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात वाटप केले जाणार आहेत.
या उपक्रमासाठी घाटंजीमधील श्रमसाफल्य संस्थेने पुढाकार घेतला. तसेच अस्तित्व फाऊंडेशन, दिलासा संस्था आणि आधार फाऊंडेशनच्या सहकार्याने दान महोत्सव राबविण्यात आला. शुक्रवारी पहाटेपासूनच शहरातील विविध भागात जुने कपडे गोहा करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले होते. शहरातील दत्त चौक, आर्णी नाका, दर्डा चौक आणि स्टेट बँक चौकात हे स्टॉल्स लावण्यात आले होते.
या स्टॉलवर छोट्या मुलापासून मोठ्या मुलांपर्यंतचे कपडे, साडी, लुगडे, धोतर, पँट्स, चादर, ब्लँकेट दान देण्यात आले. या स्टॉलवर दीड हजार नागरिकांनी कपडे दिले. जवळपास ५०० पोत्यांमध्ये हे कपडे गोळा करण्यात आले. यशस्वीतेसाठी श्रमसाफल्य संस्थेचे अमित पडलपवार, आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू पडगीलवार, अस्तित्व फाऊंडेशनच्या अलका कोथळे, संगीता घुईखेडकर, लता खांदवे, नीलिमा राऊत, कीर्ती राऊत, डिंपल नक्षणे, पुष्पा तिडके, मनीषा काटे, कविता बोरकर, करुणा धणेवार, रिया कैपिल्यवार, रितू गायकवाड, ज्योत्स्ना भांगे, सरोज बरदेवे, समाजकार्य महाविद्यालय, दिलासा संस्था, शिवसमर्थ ढोलताशा पथकाचे सहकार्य लाभले.
(शहर वार्ताहर)

Web Title: 'Dan Mahotsav' for drought-hit people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.