सुशिक्षितांमुळे कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 09:43 PM2021-09-06T21:43:32+5:302021-09-06T21:44:38+5:30

Yawatmal News कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कठोर नियम तयार केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. मात्र या सूचना मानायलाही अनेकजण तयार नाहीत.

The danger of the third wave of corona spreading due to the well-educated? | सुशिक्षितांमुळे कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका?

सुशिक्षितांमुळे कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका?

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीण भागात सामूहिक पोळा झालाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य शासन वारंवार जनतेला विनवणी करीत आहे. केरळमधील ओनम उत्सव तिसरी लाट पसरण्यास कारणीभूत ठरला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात असा प्रकार घडू नये म्हणून कठोर अंमलबजावणीच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. या सूचनांचे पालन ग्रामीण भागात तंतोतंत होत आहे. मात्र शहरी भागात हा नियम पायदळी तुडविण्यात आला आहे. यातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा वाजणार तर नाही ना, अशी भीती अनेक अभ्यासकांना वाटत आहे.

(The danger of the third wave of corona spreading due to the well-educated?)

कोरोनाची पहिली लाट शहरांमध्येच पसरली होती. जिल्ह्यातील १७०० गावे पहिल्या लाटेच्या वेळेस सुरक्षित होती. दुसऱ्या लाटेच्या वेळेला शहरातून ग्रामीण भागात नागरिक गेल्याने ही लाट पसरली आणि नंतर ओसरली. आता तिसरी लाट पसरू नये म्हणून लसीकरणाची मोहीम वेगाने राबविली जात आहे. यानंतरही केवळ १२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अजूनही ७८ टक्के नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. या काळात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, अशा वारंवार सूचना दिल्या जात आहेत. मात्र या सूचना मानायलाही अनेकजण तयार नाहीत.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कठोर नियम तयार केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. यानंतर सामूहिकरीत्या साजऱ्या होणाऱ्या पोळा सणावर निर्बंध घालण्यात आले. यामुळे गावपातळीवर पोळा भरला नाही. आता तान्हा पोळाही भरणार नाही आणि मारबतची रॅली काढू नये अशा सूचना आहेत. हा नियम जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना लागू आहे. मात्र शहरातील नागरिकांनी या नियमाकडे डोळेझाक केली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेने गावामध्ये ऑटो फिरवून गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या. जागोजागी पोलीस बंदोबस्त लावला. यानंतरही रस्त्यांवर गर्दी मावणार नाही इतके लोक बाहेर पडलेत. या गर्दीला नियंत्रणात आणणे कुणालाही शक्य झाले नाही. सायंकाळपर्यत संपूर्ण रस्ता नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.

विविध कपडे, खेळणी, विविध वस्तू विक्रीसाठी दुकाने लागली होती. त्यावर खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. आता या ठिकाणी कोरोना नियमांचे पालनच झाले नाही. अनेक जण विनामास्क या ठिकाणी फिरत होते. खरेदीसाठी झुंबड उडाली होती. एका ठिकाणी ३०-४० नागरिकांचे जथ्थे खरेदीसाठी स्पर्धा करताना पहायला मिळत होते. नागरिकांच्या अशा वागण्याने कोरोना पसरला तर सर्वांनाच अवघड होणार आहे.

गर्दीवर नियंत्रण राहिलेच नाही

शहरातील गर्दीला नियंत्रित करण्यासाठी दिवसभर गाड्या फिरल्यानंतरही दुकानांच्या बाहेर मोठमोठे स्टॉल लागले. याला अटकावच झाला नाही. परिणामी नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढत गेली. यातून गर्दी नियंत्रणाबाहेर गेली.

Web Title: The danger of the third wave of corona spreading due to the well-educated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.