चिंचमंडळ-महादापेठ रस्त्याची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:03 AM2018-03-10T00:03:32+5:302018-03-10T00:03:32+5:30
तालुक्यातील चिंचमंडळ ते कोथुर्ला-महादापेठ या ग्रामीण रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची संपूर्ण दबाई केलेली गीट्टी निघाली असून या रस्त्यावरून वाहने,.....
ऑनलाईन लोकमत
मारेगाव : तालुक्यातील चिंचमंडळ ते कोथुर्ला-महादापेठ या ग्रामीण रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची संपूर्ण दबाई केलेली गीट्टी निघाली असून या रस्त्यावरून वाहने, तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे.
या रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने गेल्या १५ वर्षात रस्ता दुरूस्तीच्या नावावर लाखोची उधळण केली. काही भागात डांबरीकरण केले. झालेल्या निकृष्ट कामाने या रस्त्यावर डांबराचा टिपूसही दिसून येत नाही. २००४ मध्ये माजी आमदार वामनराव कासावार यांनी खनिज विकास निधीतून या रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण मंजुर केले होते. त्या भूमिपूजनाचा फलक चिंचमंडळ येथे अद्यापही जनतेला रस्ता दुरूस्तीच्या वाकुल्या दाखवित आहे. पण या रस्त्याबाबत बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. आता हाच रस्ता मुख्यमंत्री सडक योजना निधीतून मजबुतीकरण, डांबरीकरण होणार असल्याचे पुढारी, जि.प.चे अभियंते छातीठोकपणे सांगत आहे. मात्र मार्च महिना संपत आला तरी या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली नाही.