दारव्हा येथे एकाच दिवशी १०० युवकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:44 AM2021-05-07T04:44:05+5:302021-05-07T04:44:05+5:30
दारव्हा : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाच्या मोफत लसीकरणासाठी युवकांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी येथील १०० युवकांनी लसीकरण करवून घेतले. कोरोना ...
दारव्हा : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाच्या मोफत लसीकरणासाठी युवकांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी येथील १०० युवकांनी लसीकरण करवून घेतले.
कोरोना कहरामध्ये अवघे जग संकटात आहे. आरोग्याच्या सुविधांकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका अवघ्या जगभरातील नागरिकांना बसत आहे. त्यातही आपला देश आघाडीवर आहे. भारताने एकाच दिवशी तब्बल चार लाख रुग्ण संख्या वाढण्याचा दुर्दैवी आकडा पार केला आहे. कुंभमेळा आणि निवडणुकांचा हंगाम या देशाला भोवला असल्याचे आता स्पष्टच दिसत आहे. तसेच देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड प्रमाणात उद्रेक होतो आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुधा कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांचे आकडे वाढत आहेत.
काही दिवसांपासून मृत्यूचाही आकडा जिल्ह्याच्या रेकॉर्डला ब्रेक करणारा ठरत आहे. अशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची अशी घोषणा केली. त्याला प्रतिसाद देत शहरातील तरुणांनी लसीकरण महोत्सवात ऑनलाईन नोंदणी करून लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेतले. शहरातील तब्बल १०० च्या वर युवकांनी बुधवारी लस घेतली. स्वप्निल राठोड, पवन शेबे, पवन बलखंडे, पवन कटके, जीवन काळे, परेश मनवर, प्रवीण गुल्हाने, तुषार चिरडे, विश्वजित शेबे, अनुज शेंडे, प्रतीक सडेदार, गौरव गुव्हाणे, रितेश बानुकर, भूषण नानवटकर, हितेश कन्हेरकर, आकाश कराळे, चेतनकराळे, प्रफुल खडसे आदी युवकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेतला.