जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांचा डाटा आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 09:53 PM2018-05-23T21:53:19+5:302018-05-23T21:53:19+5:30

जिल्ह्यातील दैनंदिन कामाची गती वाढविण्यासाठी व सुसूत्रता आणण्याकरिता सीसीटीएनएस प्रणालीचा वापर केला जात आहे. ३१ पोलीस ठाण्यातील संपूर्ण डाटा आॅनलाईन झाला असून एका क्लिकवर कुठलीही माहिती उपलब्ध होण्याची सुविधा निर्माण झाली आहे.

Data online of 31 police stations in the district | जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांचा डाटा आॅनलाईन

जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांचा डाटा आॅनलाईन

Next
ठळक मुद्देसीसीटीएनएस : प्रणाली वापरण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील दैनंदिन कामाची गती वाढविण्यासाठी व सुसूत्रता आणण्याकरिता सीसीटीएनएस प्रणालीचा वापर केला जात आहे. ३१ पोलीस ठाण्यातील संपूर्ण डाटा आॅनलाईन झाला असून एका क्लिकवर कुठलीही माहिती उपलब्ध होण्याची सुविधा निर्माण झाली आहे. सीसीटीएनएस प्रणालीत काम करण्यात प्रत्येक ठाण्यातील काही ठराविक अधिकारी रस घेत असल्याने याचा सर्वदूर उपयोग थांबला आहे.
सीसीटीएनएसच्या पद्धतीनुसारच प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्याने काम करणे गरजेचे आहे. स्टेशन डायरी हद्दपार झाली असून एफआयआरसह साना व इतर कुठल्याही स्वरूपाच्या नोंदी आॅनलाईन घेतल्या जात आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वतंत्र पासवर्ड दिला आहे. या कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे जिल्हा मुख्यालयात विप्रोकडून प्रशिक्षणही झाले आहे. मात्र त्यानंतरही या प्रणालीचा प्रत्येक कर्मचारी, अधिकारी वापर करताना दिसत नाही. खास करून क्राईम रेकॉर्डच्या नोंदी जुन्याच पद्धतीने घेतल्या जात आहे. हा प्रघात मोडित काढण्यासाठी पुन्हा अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन व्यक्तिगत वापर करावा यासाठी निर्देश दिले आहेत.
पोलीस ठाण्यात एक किंवा दोन कर्मचारीच सीसीटीएनएस हाताळण्यात एक्सपार्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाण्याचा कारभार अशा पूर्ण प्रशिक्षित कर्मचाऱ्यांभोवती केंद्रित झाला आहे. हे कर्मचारी कुठल्याही कारणाने गैरहजर असल्यास दैनंदिन कामकाजात खोळंबा येतो. प्रत्येकानेच प्रभावी पद्धतीने सीसीटीएनएस प्रणाली हाताळावी यासाठी आता स्वतंत्र मोहीम उघडली आहे. पुन्हा प्रशिक्षण दिल्यानंतर कुठल्याही अधिकारी, कर्मचाऱ्याची चालढकल प्रवृत्ती सीसीटीएनएस वापराबाबत खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी तसे निर्देशही दिले असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी सांगितले.
टेक्नोसॅव्ही कर्मचाºयांची संख्या वाढविण्यावर भर
तंत्रज्ञान पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असले तरी त्याचा वापर करणारे प्रशिक्षित कर्मचारी-अधिकारी मर्यादित आहेत. त्यामुळे कामाची गती वाढण्याऐवजी काही ठिकाणी मंदावल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत ठाण्यातील संपूर्ण कर्मचाºयांना टेक्नोसॅव्ही करण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येकानेच सीसीटीएनएस प्रणालीवर काम करावे, यासाठी पुन्हा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक कर्मचारी अपडेट झाल्यास कामाची गती दुपटीने वाढण्यास मदत होईल.

Web Title: Data online of 31 police stations in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस