साईटवरून दारव्हा झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 09:36 PM2017-09-13T21:36:49+5:302017-09-13T21:38:48+5:30
कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना ज्या साईटवरून आॅनलाईन अर्ज भरल्यास सांगण्यात आले. त्या साईटवर दारव्हा गावच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहो. त्यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत.
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना ज्या साईटवरून आॅनलाईन अर्ज भरल्यास सांगण्यात आले. त्या साईटवर दारव्हा गावच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहो. त्यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत.
विशेष म्हणजे हे अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता दोनच दिवस उरले असून, एवढ्या कमी वेळात हजारो शेतकºयांचे अर्ज कसे आॅनलाईन भरले जाणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घ्यायचा झाल्यास पात्र शेतकºयांना सेतू केंद्र, इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन आॅनलाईन अर्ज करावे लागतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ठराविक नमुन्यात प्रत्येकाची माहिती भरावी लागते. प्राथमिक माहिती भरल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीचे नाव, गावाचे नाव असा पर्याय येतो. परंतु, दारव्ह्याच्या शेतकºयांना दारव्हा नगरपालिका असल्याने ग्रामपंचायतीच्या रकान्यात गावाचे नाव टाकता येत नाही आणि टाकल्यास अर्ज स्वीकारल्या जात नाही. दारव्हा या गावाचे नावच साईटवर नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. याबाबत काही शेतकºयांची तहसीलदारांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या कानावर टाकली. त्याचप्रमाणे सेतू केंद्र व इंटरनेट कॅफेवाल्यांनीसुद्धा त्यांना निवेदन सादर केले असून, त्यामध्ये दारव्हा खंड १ व खंड २ चे नाव सदर वेबसाईटमध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे आम्ही केवळ शेतकºयांचे रजिस्ट्रेशन करून ठेवत आहो. पुढे काही समस्या उद्भवल्यास पूर्ण अर्ज कमी कालावधीत भरता येणार नाही, असे स्पष्ट कळविण्यात आले आहे.
तहसीलदारांनी साईट अपडेट होईल, असे शेतकºयांना सांगितले होते. परंतु अद्यापही दारव्हा शहराचे नाव समाविष्ट न झाल्याने शेतकरी अडचणीत सपडले आहे.
दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन
गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे कर्जमुक्तीच्या अर्जाचे कामकाज ठप्प पडले आहे. सेतू केंद्र इंटरनेटवर शेतकºयांच्या रांगा लागल्या आहे. शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे दारव्हा तालुक्यात स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.