पत्नीचा मृतदेह पाहून पतीनेही सोडला श्वास!

By admin | Published: April 4, 2017 12:03 AM2017-04-04T00:03:23+5:302017-04-04T00:03:23+5:30

आयुष्यभर संकटे आली. गरिबी, आजार. तरीही पती-पत्नी हरले नाही. एकमेकांचे साथी बनत एकमेकांना धीर देत जगले. पण विवंचना त्यांना आतून पोखरत राहिली. वयही थकलेच होते.

The dead body of the wife to see the breath! | पत्नीचा मृतदेह पाहून पतीनेही सोडला श्वास!

पत्नीचा मृतदेह पाहून पतीनेही सोडला श्वास!

Next

नेरमध्ये शोककळा : चंद्रकला-सखाराम यांना एकाच चितेवर भडाग्नी
नेर : आयुष्यभर संकटे आली. गरिबी, आजार. तरीही पती-पत्नी हरले नाही. एकमेकांचे साथी बनत एकमेकांना धीर देत जगले. पण विवंचना त्यांना आतून पोखरत राहिली. वयही थकलेच होते. अशातच रविवारी पत्नीने श्वास सोडला. तिचा मृतदेह पाहून तिच्याशेजारीच रडत-रडत पतीनेही डोळे मिटले. एका सुस्वभावी वृद्ध दाम्पत्याचा हा अखेरचा प्रवास नेरवासीयांच्या मनात भावनिक कोलाहल निर्माण करून गेला.
सखाराम कुनगर आणि चंद्रकला कुनगर, असे या मृत दाम्पत्याचे नाव आहे. यवतमाळ येथील ‘लोकमत’चे जुने वितरक सखाराम कुनगर हे कालांतराने नेर येथे स्थायिक झाले. येथील बसस्थानकावर बुक स्टॉल चालवून आपल्या कुटुंबाचा भार वाहत होते. मात्र व्यवसायातील नुकसानामुळे त्यांची परिस्थिती सावरली नाही. पुढे ते गाडीवर ब्रेड-बिस्किटे विकून उपजिविका चालवू लागले होते.
अशातच २० वर्षांपूर्वी त्यांची पत्नी चंद्रकला लकव्यामुळे दोन्ही पायांनी अपंग झाल्या. या दाम्पत्याच्या वेदनेचा खरा प्रवास इथूनच कठीण बनला. सखाराम पूर्ण वेळ पत्नीच्या सेवेत घालवू लागले.
त्यांचा मुलगा जीवन नेरच्या बसस्थानकावर खरमुरे विकून आपल्या आईवडिलांचा सांभाळ करीत होता. उपवर मुलीचा विवाह होऊन तुटल्याने गेल्या काही महिन्यांपासून सखाराम आणि चंद्रकला हे दोघेही अस्वस्थ होते.
रविवारी दुपारी ४ वाजता चंद्रकलाने शेवटचा श्वास घेतला. आपल्यावर प्रेम करणऱ्या सहचारिणीचा मृतदेह पाहून सखाराम हमसून हमसून रडले. अन् रडत-रडत त्यांनीही पत्नीशेजारीच डोळे मिटले. दोघाही पती-पत्नीला एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The dead body of the wife to see the breath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.