एसटी बसच्या धडकेत डबेवाल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 09:44 PM2018-09-12T21:44:50+5:302018-09-12T21:45:18+5:30
दारव्हा मार्गावरील एमआयडीसी परिसरात एसटी बसची धडक लागून डबेवाल्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १.३0 वाजता घडली. विद्यार्थ्यांचे डबे घेऊन जाताना चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारव्हा मार्गावरील एमआयडीसी परिसरात एसटी बसची धडक लागून डबेवाल्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १.३0 वाजता घडली. विद्यार्थ्यांचे डबे घेऊन जाताना चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.
उत्तमराव गायकवाड (५०) रा.वंजारीफैल, असे मृताचे नाव आहे. ते दुचाकीने शाळकरी मुलांना डबे पोहोचविण्याचे काम करीत होते. बुधवारी दुपारी डबे घेऊन जाताना त्यांनी एसटीला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात एसटी चालकाने दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्याकडेला गेली. यात दुचाकीला जोरदार धडक बसली. गंभीर अवस्थेत गायकवाड यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती बसस्थानक प्रमुख गोविंद उजवणे यांनी दिली.