जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु ; 30 जणांची नव्याने भर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 07:27 PM2020-07-18T19:27:45+5:302020-07-18T19:29:04+5:30

'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' : 17 जणांना सुट्टी

Death of a coronary artery patient in the district; Newly added 30 people | जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु ; 30 जणांची नव्याने भर

जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु ; 30 जणांची नव्याने भर

Next

यवतमाळ : जिल्ह्यात आज (दि. 18) एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने मृत्युची संख्या 17 झाली आहे. तर 30 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझेटिव्ह आलेले 17 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  शनिवारी मृत्यु झालेला व्यक्ती (वय 53) हा पुसद शहरातील दुधे ले-आऊट येथील रहिवासी होता. तसेच नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 30 जणांमध्ये 16 पुरुष आणि 14 महिला आहेत. 

यात नेर शहरातील चिरडे ले-आऊट येथील तीन पुरुष व तीन महिला, नेर शहरातील जलाराम नगर येथील एक पुरुष, नेर शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील तारपुरा येथील एक महिला तसेच आणखी यवतमाळ येथील दोन पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यातील चार पुरुष व पाच महिला, कळंब तालुक्यातील जोडमोह येथील एक पुरुष, दिग्रस येथील चार पुरुष व चार महिला पॉझेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात शनिवारपर्यंत 144 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात आज 30 जण नव्याने पॉझेटिव्ह आल्याने हा आकडा 174 वर पोहचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 17 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 157 आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 100 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 57 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 548 एवढी आहे. यापैकी 374 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 17 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 127 जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 9192 नमुने पाठविले असून यापैकी 8973 प्राप्त तर 156 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 8425 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: Death of a coronary artery patient in the district; Newly added 30 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.