विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, लोणी येथे चक्काजाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 01:46 PM2017-10-25T13:46:29+5:302017-10-25T13:47:04+5:30

विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आर्णी तालुक्यातील लोणी येथे घडली.

The death of the farmer by electric shocks, death at butter | विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, लोणी येथे चक्काजाम

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, लोणी येथे चक्काजाम

Next

यवतमाळ - विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आर्णी तालुक्यातील लोणी येथे घडली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दारव्हा-आर्णी मार्गावर चक्का जाम आंदोलन केलं. दिवसा होणाऱ्या भारनियमनामुळे रात्री शेत ओलित करावं लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. 

संतोष विष्णू होळकर (३०) रा. लोणी असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. लोणी परिसरात दिवसभर भारनियमन होत असल्याने शेतकऱ्यांना मंगळवारी रात्री ओलित करावे लागते. सिंचन करण्यासाठी संतोष आपल्या शेतात गेला होता.  शेतातील डीपीमधील विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही बाब सकाळी उघडकीस आल्यानंतर गावकरी संतप्त झाले. दारव्हा-आर्णी मार्गावर लोणी बसस्थानकासमोर गावकºयांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले. टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

Web Title: The death of the farmer by electric shocks, death at butter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.