टिपेश्वर अभयारण्यातील जखमी वाघिणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 09:05 AM2019-03-18T09:05:41+5:302019-03-18T09:41:22+5:30

पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील जखमी वाघिणीचा रविवारी मृत्यू झाला. 

Death of injured tiger in Tippeshwar sanctuary | टिपेश्वर अभयारण्यातील जखमी वाघिणीचा मृत्यू

टिपेश्वर अभयारण्यातील जखमी वाघिणीचा मृत्यू

Next

यवतमाळ : पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील जखमी वाघिणीचा रविवारी मृत्यू झाला. ही वाघीण काही महिन्यांपासून अंगात कुंपणाच्या तर अडकल्याने जखमी होती. वनविभागाने तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला पकडून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण ती वणाधिकार्यना हुलकावणी देत होती. रविवारी पुन्हा तिला पकडण्याचा प्रयत्न झाला असता तिने पथकातील अश्विन नामक युवकावर हल्ला केला. गमभिर जखमी अश्विन ला यवतमाळला रेफर करण्यात आले. पांढरकवडाचे वन्यजीव उपवनसंरक्षक पांच्याभाई यांनी वाघिणीच्या मृत्यूला दुजोरा दिला. 

टिपेश्वर अभयारण्यातील टी-4 वाघिणीच्या गळ्यात तार अडकली होती. वनविभागानं तिला जेरबंद करण्याची मोहीमही आखली होती. परंतु वाघिणीची हालचाल रात्रीच्या दरम्यान होत असल्यानं तिला ट्रॅक करणं शक्य झालं नाही. काल ती वाघीण वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसली. पण त्या वाघिणीची हालचाल फारच मंदावलेली होती. तिला स्वतःच्या पायावर नीट उभेही राहता येत नव्हते. त्यानंतर वाघिणीला बेशुद्ध करून तात्काळ उपचारासाठी पाठवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्या वाघिणीचा मृत्यू झाला. आता तिच्या शवविच्छेदन करण्यात येणार आहे, अशी माहिती पांढरकवडाचे वन्यजीव उपवनसंरक्षक पांच्याभाई यांनी दिली आहे. 

Web Title: Death of injured tiger in Tippeshwar sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ