वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याचा मृत्यू
By सुरेंद्र राऊत | Published: September 25, 2022 02:27 PM2022-09-25T14:27:57+5:302022-09-25T14:28:11+5:30
घाटंजी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याची ४१ दिवसाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली.
घाटंजी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याची ४१ दिवसाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. उपचारा दरम्यान रविवारी पहाटे त्याचे निधन झाले.
कर्णूजी पेंदोर ६० असे मृत्यू पावलेल्या गुराख्याचे नाव आहे. तालुक्यातील साखरा वन परिक्षेञातील टिटवी बिट परिसरात शनिवार २०आॕगष्ट रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कर्णूजी पेंदोर हे गुरे चारण्यास गेले असता त्याचेवर वाघाने हल्ला केला होता.लोकांनी आरडाओरडा करुन वाघास हुसकावून लावले होते.पण यात कर्णूजी गंभीर जखमी झाले होते.त्यांना यवतमाळ येथे व नंतर नागपूर येथे रुग्णालयात भरती केले होते. तब्बल ४१दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली.पण अखेर उपचारा दरम्यान रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.त्यांचे मागे पत्नी,दोन मुल,तीन मुली आहेत.तालुक्यात टिपेश्वर अभयारण्य आहे.वन्य प्राणी हे नेहमीच आजुबाजूच्या गावात घुसतात.नेहमीच येथे वाघाचे हल्ले.रानडुकराचे हल्ले या घटना घडत आहे.नागरिक भयभीत आहेत.काल परवा तर येथील न्यायालय परिसरात आणि वस्तीत अस्वलाने सुमारे सात तास धुमाकूळ घातला होता.वनविभागाने याची गभीरपणे दखल घेऊन नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.