टिपेश्वर अभयारण्यातील टी-थ्री वाघाचा मृत्यू; सिलबंद नमूने तपासणीसाठी पाठविले प्रयोगशाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 02:29 PM2023-06-30T14:29:56+5:302023-06-30T14:30:25+5:30
वाघाचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. वनगुन्हा जारी करून पंचनामा करण्यात आला.
टिपेश्वर अभयारण्यातील टी-थ्री वाघाचा मृत्य झाला. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी परिक्षेत्रातंर्गत वनकर्मचारी हे हंगामी मजुरांसह अर्ली वर्तुळातील भवानखोरी बिट कक्ष क्रमांक 105 मध्ये गस्त करीत असताना उघडकीस आली.
पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वन अधिकार्यांनी मृत वाघाचे निरीक्षण केले. मृत वाघ हा नर असून, टी-थ्री (सब अॅडल्ट) असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. त्यात कुठेही मनुष्याच्या पाऊलखुणा आढळल्या नाहीत. पशुवैद्यकीय अधिकार्यांनी मृत वाघाचे शवविच्छेदन केले.
वाघाचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. वनगुन्हा जारी करून पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनाचे आवश्यक ते सिलबंद नमूने तपासणीसाठी अमरावती येथील उपसंचालक, प्रादेशिक न्यायविभाग, वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अहवालानंतर कळणार आहे.