आनंदोत्सवाकडे धावणाऱ्या तरुणाला मृत्युने गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 08:57 PM2022-11-05T20:57:18+5:302022-11-05T20:58:03+5:30

Yawatmal News साक्षगंधाच्या आनंदोत्सवात सामील होण्यासाठी यवतमाळ येथून नागपूरकडे निघालेल्या तरुणांच्या कारचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यात येथील भावेश सुशील भरुट (जैन) यांचा जागीच मृत्यू झाला.

Death overtook the youth running towards the festival | आनंदोत्सवाकडे धावणाऱ्या तरुणाला मृत्युने गाठले

आनंदोत्सवाकडे धावणाऱ्या तरुणाला मृत्युने गाठले

Next
ठळक मुद्देयवतमाळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

यवतमाळ : साक्षगंधाच्या आनंदोत्सवात सामील होण्यासाठी यवतमाळ येथून नागपूरकडे निघालेल्या तरुणांच्या कारचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यात येथील भावेश सुशील भरुट (जैन) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार तरुण गंभीर जखमी झाले. ही वार्ता यवतमाळात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. शनिवारी दुपारी येथील पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात भावेश यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यवतमाळ येथील एका कुटुंबातील साक्षगंधाचा कार्यक्रम नागपूरच्या हॉटेल तुली येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी भावेश भरुट (२२) व अन्य चौघे कारने शुक्रवारी रात्री नागपूरकडे निघाले होते. दरम्यान वर्धा जिल्ह्यातील सेलूजवळ उडाण पुलावर त्यांची कार डिव्हायडरवर आदळली. कारचा वेग प्रचंड असल्याने ही कार डिव्हायडर ओलांडून पलट्या घेत आदळली. त्यात कारमधील भावेश भरुट रा. पेशवे प्लॉट, यवतमाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर यश गणेश इंगोले, शंतनू रामभाऊ पराते, ऋतिक गजानन गायकवाड व अथर्व चालमवार सर्व रा. यवतमाळ हे गंभीर जखमी झाले. यावेळी याच कुटुंबीयांची ट्रॅव्हल्स मागून येत होती. त्यांना हा अपघात दिसताच सेलू पोलिसांना माहिती देण्यात आली व जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यात आले. या घटनेने संपूर्ण यवतमाळ शहरात शोककळा पसरली आहे.

समाजातील युवकांनी भावेशच्या गुणांचे अनुकरण करावे - किशोर दर्डा

शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी भावेश भरुट यांच्या पार्थिवावर यवतमाळ येथील हिंदू मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी गुरुदेव अक्षय ऋषीजी म.सा., अमृत ऋषीजी म.सा., गीतार्थ ऋषीजी म.सा., आमदार मदन येरावार, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी सांत्वनपर भेट दिली. सकल जैन समाजाचे आधारस्तंभ किशोर दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. सकल जैन समाजातील उत्कृष्ट अष्टपैलू युवा व्यक्तिमत्त्व आज हरविले आहे. मनमिळावू उमद्या नेतृत्वाचे भावेश यांचे गुण युवकांनी आत्मसात करावे. तसेच समाजाच्या उत्थानासाठी नेतृत्व उभे करावे, असे विचार मांडत किशोर दर्डा यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. या प्रसंगी जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा, भारतीय जैन संघटनेचे प्रकाशचंद छाजेड, विजय बुंदेला, महेंद्र सुराणा, गौतम कटारिया, राजेंद्र गेलडा, संजय झांबड, भवरीलाल बोरा, संजय नखत, जवाहर बोरा, नरेंद्र कोठारी, अमोल येरावार, किशोर बोरा, महेंद्र बोरा, रवींद्र बोरा यांच्यासह शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या शोकसभेचे संचालन अशोक कोठारी यांनी केले.

Web Title: Death overtook the youth running towards the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात