विषबाधेने पुन्हा तीन शेतकºयांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 10:52 PM2017-10-01T22:52:24+5:302017-10-01T22:52:41+5:30

कीटकनाशकाची फवारणी करताना झालेल्या विषबाधेने जिल्ह्यात आणखी तीन शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

Death of three farmers by poisoning again | विषबाधेने पुन्हा तीन शेतकºयांचा मृत्यू

विषबाधेने पुन्हा तीन शेतकºयांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देफवारणी : आमलोन, पिसगाव व सावरगावची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कीटकनाशकाची फवारणी करताना झालेल्या विषबाधेने जिल्ह्यात आणखी तीन शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. वणी तालुक्यातील आमलोन, मारेगाव तालुक्यातील पिसगाव आणि कळंब तालुक्यातील सावरगाव येथे शेतकºयांचा विषबाधेने मृत्यू झाला.
वणी तालुक्यातील आमलोन येथील शेतकरी दत्तात्रय गजानन टेकाम (३५) याने गत चार दिवस आपल्या शेतातील पिकांवर कीटकनाशकाची फवारणी केली. या दरम्यान त्याला विषबाधा झाल्याचे लक्षात आले. उपचारासाठी तत्काळ कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने कुटुंंबियांनी वणीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रविवारी सकाळी १० वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी घटना मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे घडली. शंकर नागोराव आगलावे (४६) यांनी आपल्या शेतात चार दिवसापूर्वी कीटकनाशकाची फवारणी केली. फवारणीनंतर त्यांना डोकेदुखीचा त्रास वाढला. रुग्णालयात उपचारासाठी गेला असता विषबाधा झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तत्काळ नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांचाही रविवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला.
तिसरी घटना कळंंब तालुक्यातील सावरगाव येथे घडली. गजानन नामदेव फुलमाळी (५२) यांनीसुद्धा आपल्या शेतात कीटकनाशकांची फवारणी केली होती. चार दिवसापूर्वी विषबाधा झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. जिल्ह्यात गत तीन महिन्यांपासून १८ शेतकºयांचा विषबाधेने मृत्यू झाला असून ६०० वर रुग्ण उपचार घेत मृत्यूशी झुंज देत आहे. प्रशासकीय यंत्रणा यामागील कारणांचा शोध घेत आहे. परंतु उपाययोजना सापडत नाही.

Web Title: Death of three farmers by poisoning again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.