हा आहे पुरुषभर उंचीचे खड्डे असलेला यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यू सापळा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 12:16 PM2020-11-03T12:16:04+5:302020-11-03T12:16:29+5:30
Yawatmal News Road यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झरी तालुक्यातील कोसारा ते मारेगाव या रस्त्यावर मनुष्यभर उंचीचे अतिशय मोठे मोठे खड्डे पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झरी तालुक्यातील कोसारा ते मारेगाव या रस्त्यावर मनुष्यभर उंचीचे अतिशय मोठे मोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. या रस्त्यावर एखाद्याचा अपघात होईल तेव्हा सरकारचे डोळे उघडे होईल का असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहे.
हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून या रस्त्यावर अपघातसुद्धा झाले आहेत. पण सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या रस्त्यावर माणूस भर खड्डे पडले आहे. या मार्गाने वाहन चालवणे तर सोडा तर साधे पाई सुद्धा जाण्यास जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागत आहे.
1994 साली हा पूल बांधल्यानंतर प्रशासनाने व शासनाने या रस्त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या गावातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार सूचना करून सुद्धा या कडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर अपघात होऊन मनुष्य हानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का असा सवाल नागरिक करीत आहे .
शासनाने कोसारा ते मारेगाव या मुख्य रस्त्या कडे त्वरित लक्ष देऊन ह्या पुलाची व रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता व पूल व्यवस्थित करण्याची मागणी कोसारा डोंगरगाव येथील नागरिक करत आहे. अन्यथा येथील ग्रामस्थ आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला.