शेतमालाच्या पोषकद्रव्यानुसार हमीभाव जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:43 AM2021-04-04T04:43:04+5:302021-04-04T04:43:04+5:30
या समितीने सुरुवातीला नागपूर येथील ॲनाकॉन लॅबोरेटरीकडे पोषक द्रव्य तपासणीसाठी सोयाबीनचे १०० ग्राम सॅम्पल पाठविले होते. लॅबोरेटरीकडून १०० ग्राम ...
या समितीने सुरुवातीला नागपूर येथील ॲनाकॉन लॅबोरेटरीकडे पोषक द्रव्य तपासणीसाठी सोयाबीनचे १०० ग्राम सॅम्पल पाठविले होते. लॅबोरेटरीकडून १०० ग्राम सोयाबीनमध्ये ३९ टक्के प्रोटीन असल्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे प्रति किलोमध्ये ३९० ग्रॅम प्रोटीन असल्याचे स्पष्ट होते. प्रोटिनच्या पोषक द्रव्यांची औषधी दुकानात प्रति किलो किंमत चार ते पाच हजार रुपये आहे आणि सोयाबीनचे हमीभाव चार हजार ३०० रुपये क्विंटल आहे.
दरात मोठी तफावत आढळून आल्याने समितीने चाचणी अहवालासह कृषी मूल्य आयोगाला निवेदन पाठविले. राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाने दरवर्षी कुठल्याही पिकाची आधारभूत किंमत मोघमपणे जाहीर न करता सगळ्या प्रकारच्या पिकांची पोषक द्रव्यांची चाचणी करून त्यातील पोषकद्रव्ये, जीवनसत्वे यांची चालू बाजार मूल्य किंमत ग्राह्य मानून हमीभाव निश्चित करावा, अशी मागणी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव राठोड, कार्याध्यक्ष उत्तम राठोड, तालुकाध्यक्ष जानूसिंग राठोड, सचिव ज्ञानेश्वर दुधे यांनी निवेदनातून केली आहे.