एचआयव्हीग्रस्त रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 09:55 PM2017-12-05T21:55:36+5:302017-12-05T21:55:52+5:30

उद्योगांची संख्या मोठी असलेल्या वणी परिसरात गेल्या पाच वर्षांत एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. व्यापक जनजागृतीचा हा परिणाम असल्याचे मानले जाते.

Decrease in HIV-infected patients | एचआयव्हीग्रस्त रुग्णसंख्येत घट

एचआयव्हीग्रस्त रुग्णसंख्येत घट

Next
ठळक मुद्देवणी परिसर : व्यापक जनजागृतीचा परिणाम, सात हजारांवर रूग्णांची तपासणी

म.आसिफ शेख ।
आॅनलाईन लोकमत
वणी : उद्योगांची संख्या मोठी असलेल्या वणी परिसरात गेल्या पाच वर्षांत एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. व्यापक जनजागृतीचा हा परिणाम असल्याचे मानले जाते.
वणी परिसरात मागील १० वर्षांत ५४३ एचआयव्हीग्रस्तांची नोंद झाली. मागील वर्षी ७५ तर चालू वर्षात केवळ ४५ रुग्ण आढळलेत. वणी परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. त्यातही कोळशाशी संबंधीत उद्योगांची संख्या मोठी आहे. परिणामी या भागात परप्रांतिय मजूर मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी येतात. जिल्ह्यात दरवर्षी २९ हजार परप्रांतिय कामगारांचे आवागमन सुरू असते. त्यात वणीसह पुसद, यवतमाळ या शहरांचा समावेश आहे. महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत कामगारांची दरवर्षी रक्ततपासणी केली जाते. ज्या ठिकाणी कामगारांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी जाऊन संस्थेच्या चमूमार्फत कामगारांची रक्त तपासणी केली जाते. यावर्षी वणी शहरालगतच्या लालपुलिया परिसरात ६०० कामगारांचे रक्त तपासण्यात आले. निळापूर-ब्राह्मणी परिसरात १००, राजूर कॉलरी येथे २००, लालगुडा औद्योगिक परिसरात १०० कामगारांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे एचआयव्हीचा फैलाव करणारा मुख्य परिसर मानला जाणाºया येथील रेडलाईट परिसरात ५०० महिलांची रक्त तपासणी करण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालयातील एचआयव्ही तपासणी केंद्रात तीन हजार ६३० महिला पुरूषांची तपासणी करण्यात आली. सोबतच दोन हजार १२० गर्भवती महिलांची देखील तपासणी करण्यात आली. अशा एकूण सात हजार २५० जणांची तपासणी केली गेली. ही तपासणी एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत करण्यात आली. यात ४५ रुग्ण एचआयव्हीबाधित रुग्ण आढळले.

बरेच रुग्ण एचआयव्हीची बाधा झाल्यानंतर ती बाब लपवून ठेवतात. मात्र घाबरण्याचे कारण नाही. याबाबत संबंधिताने आपल्या कुटुंबाला माहिती दिली पाहिजे. शासकीय रुग्णालयात समुपदेशन केंद्र आहे. तेथे मोफत तपासणी होते. औषधोपचारही केला जातो. त्याचा लाभ प्रत्येक रुग्णांनी घेतला पाहिजे.
प्रकाश काळे, समुपदेशक, ग्रामीण रुग्णालय वणी.

Web Title: Decrease in HIV-infected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.