महागाव औषधी विक्रेता संघाकडून स्वर्गरथाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:41 AM2021-04-07T04:41:45+5:302021-04-07T04:41:45+5:30

(फोटो) महागाव : तालुका औषधी विक्रेता संघाकडून जनतेच्या सेवेकरिता स्वर्गरथाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा शनिवारी ...

Dedication of Swargaratha by Mahagaon Drug Dealers Association | महागाव औषधी विक्रेता संघाकडून स्वर्गरथाचे लोकार्पण

महागाव औषधी विक्रेता संघाकडून स्वर्गरथाचे लोकार्पण

Next

(फोटो)

महागाव : तालुका औषधी विक्रेता संघाकडून जनतेच्या सेवेकरिता स्वर्गरथाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला.

जिल्हा औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष पंकज नानवाणी अध्यक्षस्थानी होते. अमरावती झोनचे अध्यक्ष संजय पिंपळखुटे, संजय बोरले, संजय बनगीनवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, अनिल नरवाडे, शैलेश कोपरकर, रामराव पाटील-नरवाडे, तालुका औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष श्रीरंग चिद्दरवार, किशोर बोंपीलवार, जगदीश नरवाडे, मालाताई देशमुख, माजी नगरसेविका आशा भरवाडे, छाया वाघमारे, जयश्री नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महागाव मुख्यालयास तालुक्याचा दर्जा मिळून ३८ वर्षे झाली, परंतु शहरात अंत्ययात्रा काढण्यासाठी शववाहिनीची (स्वर्गरथ) सुविधा नव्हती. समाजहिताच्या कामात केमिस्ट बांधव सातत्याने पुढे असतात. यापुढेही समाजोपयोगी कामात संघटनेचा पुढाकार राहील, अशी ग्वाही पंकज नानवाणी आणि संजय पिंपळखुटे यांनी दिली. कोविड महामारीत रुग्णांसाठी रक्ताची कमतरता जाणवत असून, महागाव येथे लवकरच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल, अशी माहिती श्रीरंग चिद्दरवार यांनी दिली. स्मशानभूमीतील विकास कामांसाठी सतीश देवरकर, दिलीपराव कोपरकर, गजानन वाघ, संतोष नरवाडे, किसन घोडे, विनोद पहुरकर, किराणा असोसिएशनचे उदय नरवाडे, नितीन येरावार, विशाल चक्करवार, वासुदेव नेवारे यांनी रोख आर्थिक मदत दिली. या मान्यवरांचा समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. स्वर्गरथाचे मोफत सारथ्य करण्याची जबाबदारी पत्रकार ज्ञानेश्वर ठाकरे आणि नंदकुमार कावळे यांनी घेतली. त्यांचाही समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. श्रीरंग चिद्दरवार, जयंत चौधरी, सुनील पोदुटवार व केमिस्ट बांधवांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

तालुक्यातील जनतेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प शिवाजीराव देशमुख, सवनेकर यांनी जाहीर केला. गणपतराव पाटील, नरवाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शीत शवपेटी देण्याचा संकल्प जयश्री संजय नरवाडे यांनी व्यक्त केला.

Web Title: Dedication of Swargaratha by Mahagaon Drug Dealers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.