महागाव औषधी विक्रेता संघाकडून स्वर्गरथाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:42 AM2021-04-16T04:42:24+5:302021-04-16T04:42:24+5:30
यवतमाळ जिल्हा औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष पंकज नानवाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अमरावती झोनचे अध्यक्ष संजय पिंपळखुटे, संजय बोरले, संजय ...
यवतमाळ जिल्हा औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष पंकज नानवाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अमरावती झोनचे अध्यक्ष संजय पिंपळखुटे, संजय बोरले, संजय बनगीनवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, अनिल नरवाडे, शैलेश कोपरकर, रामराव पाटील-नरवाडे, तालुका औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष श्रीरंग चिद्दरवार, किशोर बोंपीलवार, जगदीश नरवाडे, मालाताई देशमुख, आशा भरवाडे, छाया वाघमारे, जयश्री नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महागावला तालुक्याचा दर्जा मिळून ३८ वर्षे झाली; परंतु शहरात मृतदेहांची अंत्ययात्रा काढण्यासाठी शववाहिनीची (स्वर्गरथ) सुविधा नव्हती. परिणामी खांद्यावर तिरडी घेऊन स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढावी लागत होती. जनतेच्या सोयीसाठी स्वर्गरथाची सुविधा महागाव औषधी विक्रेता संघाने करून दिली. समाजहिताच्या कामात केमिस्ट बांधव सातत्याने पुढे असतात. यापुढेही समाजोपयोगी कामात संघटनेचा पुढाकार राहील, अशी ग्वाही पंकज नानवाणी, संजय पिंपळखुटे यांनी दिली.
कोविड महामारीत रुग्णांसाठी रक्ताची कमतरता जाणवत असून येथे लवकरच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल, अशी माहिती श्रीरंग चिद्दरवार यांनी दिली. स्मशानभूमीतील विकास कामांसाठी सतीश देवरकर, दिलीप कोपरकर, गजानन वाघ, संतोष नरवाडे, किसन घोडे, विनोद पहुरकर, उदय नरवाडे, नितीन येरावार, विशाल चक्करवार, वासुदेव नेवारे यांनी रोख आर्थिक मदत दिली. त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वर्गरथाचे मोफत सारथ्य करण्याची जबाबदारी ज्ञानेश्वर ठाकरे, नंदकुमार कावळे यांनी घेतली. त्यांचाही सत्कार करण्यात आला. श्रीरंग चिद्दरवार, जयंत चौधरी, सुनील पोदुटवार व केमिस्ट बांधवांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.
बॉक्स
जनतेच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका, शीत शवपेटी
तालुक्यातील जनतेच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प शिवाजीराव देशमुख-सवनेकर यांनी जाहीर केला. शीत शवपेटी (फ्रिझर) देण्याचा संकल्प जयश्री संजय नरवाडे यांनी व्यक्त केला. यामुळे जनतेला सुविधा मिळणार आहे.