दिग्रसमध्ये वीज कर्मचाऱ्यांची थकबाकीदारांशी अरेरावी

By admin | Published: February 26, 2017 01:15 AM2017-02-26T01:15:37+5:302017-02-26T01:15:37+5:30

मार्च एडिंग लक्षात घेता महावितरण कंपनीकडून जोरदार वसुली मोहीम सुरू आहे. मात्र, या मोहिमेत तालुक्यातील ठराविक

In Degras, the power workers are notorious with the defaulters | दिग्रसमध्ये वीज कर्मचाऱ्यांची थकबाकीदारांशी अरेरावी

दिग्रसमध्ये वीज कर्मचाऱ्यांची थकबाकीदारांशी अरेरावी

Next

ठराविक भागावर वक्रदृष्टी : अतिसंवेदनशील भागाला मात्र ‘खो’
दिग्रस : मार्च एडिंग लक्षात घेता महावितरण कंपनीकडून जोरदार वसुली मोहीम सुरू आहे. मात्र, या मोहिमेत तालुक्यातील ठराविक भागावरच कंपनीची वक्रदृष्टी पडली असून, अतिसंवेदनशील परिसरातील गब्बर ग्राहकांना जाणीवपूर्वक सुट दिली जात आहे. सामान्य जनतेला वेठीस धरणारे महावितरणचे कर्मचारी थकबाकीदारांसोबत अक्षरश: अरेरावी करीत आहेत.
आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे. त्यामुळे शासनाच्या विविध विभागांसोबत महावितरण कंपनीसुद्धा थकित रक्कम गोळा करण्यासाठी सरसावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत यंत्रणा वसुलीच्या कामास जुंपन्यात आली आहे. हे कर्मचारी सामान्य थकबाकीदार ग्राहकांचे काही एक ऐकूण न घेता, विद्युत जोडणी तोडून टाकत आहेत. वीज जोडणी तोडताना ग्राहकांना मानसिक त्रासासह कर्मचाऱ्यांच्या आरेरावीलाही तोंड द्यावे लागत आहे.
काही वर्षांपूर्वी दिग्रस कार्यालय वसुलीच्याबाबती विभागातून प्रथम क्रमांकावर होते. अलिकडील काळात जुन्या वसुलीसह नवीन वसुली कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली. वसुली प्रकरणी एका परिविक्षाधीन अधिकाऱ्यावर नागपूर वीज वितरण कार्यालयाने २५ हजारांचा दंडही लावला.
काही महिन्यांपूर्वी दिग्रस येथे नव्याने रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता गणेश चव्हाण यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्हाला थकबाकी वसूल करणे गरजेचे आहे. आम्ही कर्मचाऱ्यांमार्फत तसेच ध्वनीक्षेपकावरून जाहीर आवाहन करून थकबाकीदारांना सूचना दिल्या आहेत. तरीही थकबाकी येत नसल्याने आम्हाला वीज जोडणी तोडण्याशिवाय पर्याय नाही.
शहर तथा ग्रामीण भागातील ‘मोजक्या’ परिसरावर मात्र वीज कर्मचारी मेहरनजर दाखवित असून, नरमाईची भूमिका घेत आहे. सामान्य ग्राहकांच्याबाबतीत मात्र जोडणी कापण्याची कठोर भूमिका दिसते. एखाद्या ग्राहकाने वाद घातल्यास त्याच्यावर चांगलेच लक्ष ठेवले जाते. आठ ते दहा कर्मचारी एकदम त्याच्या घरी जात असल्याने महिलांच्या उरात धडकी भरते. त्यामुळे पठाणी वसुली आणि कर्मचाऱ्यांच्या अरेरावीला आळा घालण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In Degras, the power workers are notorious with the defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.