दिल्लीचे पथक आज यवतमाळात अमृत योजना : शहरात स्वच्छतेची तपासणी

By Admin | Published: January 11, 2017 12:27 AM2017-01-11T00:27:35+5:302017-01-11T00:27:35+5:30

अमृत शहर योजनेत देशभरातील ५०० च्यावर नगरपलिकांची निवड करण्यात आली आहे.

Delhi squad: Amrit scheme in Yavatmal today: Cleanliness check in the city | दिल्लीचे पथक आज यवतमाळात अमृत योजना : शहरात स्वच्छतेची तपासणी

दिल्लीचे पथक आज यवतमाळात अमृत योजना : शहरात स्वच्छतेची तपासणी

googlenewsNext

यवतमाळ : अमृत शहर योजनेत देशभरातील ५०० च्यावर नगरपलिकांची निवड करण्यात आली आहे. यासाठी दोन हजार गुणांची चाचणी घेतली जाणार आहे. दिल्ली येथील नगरविकास मंत्रालयाकडून तीन सदस्यीय पथक शहराची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. यवतमाळ शहरात बुधवारी हे पथक दाखल होत असून सलग तीन दिवस विविध मुद्दाच्या आधारे शहराचे अवलोकन करून गुणानुक्रमासाठी अहवाल तयार केला जाणार आहे.
अमृत शहर योजनेत एक लाख लोकसंख्येवरील नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय पथकाकडून शहरातील स्वच्छतेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा दर्जा, घनकचऱ्याचे व्यवस्थापन, कार्यालयीन कामकाजाचा दर्जा अशा विविध मुद्दावरून गुणांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासन तयारीला लागले आहे. पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन केले जाणार आहे.
दैनिक निघणारा घनकचरा वेगवेगळा करून त्याली सेंद्रीय कचरा, शिल्लक अन्न यापसून खत निर्मिती युनिट तयार केले आहेत. या खताचा उपयोग शहरातील उद्यानामध्ये करण्यात येतो. विघटीत न होणारा कचरा संकलीत करून कचरा डोपोवर साठविला जातो. त्यातही प्लास्टीक पिशव्यापासून रस्ते निर्मिती डांबराला पर्याय म्हणून वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्वबाबींचे प्रेझेेंटेशन दिल्लीच्या पथकापुढे केले जाणार आहे. या पथकाच्या गुणांकनावरून शहराचा दर्जा कोणता हे ठरणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Delhi squad: Amrit scheme in Yavatmal today: Cleanliness check in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.